भारतीय क्रिकेट संघाचा विस्फोटक सलामीवीर रोहित शर्मा याला संघातील सर्वात आळशी आणि विनोदी क्रिकेटपटू म्हटले जाते. कर्णधार विराट कोहली, अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन अशा सिनियर खेळाडूंनी या गोष्टीची पुष्टी केली आहे. भारतीय संघाच्या बऱ्याच खेळाडूंनी रोहितविषयी अनेक मोठ-मोठे खुलासे केले आहेत. तसेच रोहितने चाहत्यांना स्वत:विषयी आणि इतर खेळाडूंविषयी अनेक किस्से सांगितले आहेत. रोहित आणि रहाणे यांची अशीच एक मुलाखत झाली होती. या मुलाखतीदरम्यान त्यांनी अत्यंत धक्कादायक खुलासा केला होता.
अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाचा छोटासा हलगर्जीपणा रोहित आणि रहाणेच्या जीवावर बेतला असता, असे त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितले होते. व्ह्यू इंडिया या यूट्यूब चॅनलवर त्यांच्या या मुलाखतीचा व्हिडिओ आहे. या मुलाखतीत, रोहित आणि रहाणेने मिळून दक्षिण आफ्रिकामधील जंगल सफारीच्या आठवणी सांगितल्या होत्या.
रहाणे म्हणाला होता की, “आम्ही त्या जंगलात चित्त्यांना पाहायला गेलो होतो. आम्हाला वाटले की, २-३ चित्ते असतील आणि आम्ही त्यांच्या मागे मागे जाऊ. पण जंगलात गेल्यानंतर आम्हाला २०-२५ मीटर दूर गेल्यानंतर दोन चित्ते दिसले. नुकतीच त्यांनी शिकार केली होती आणि ते मांस खाण्यात व्यस्त होते. मी, राधिका (रहाणेची पत्नी), रोहित, रितीका (रोहितची पत्नी) आणि जडेजा त्यांना शांत उभा राहून पाहात होतोत. तेवढ्यात एका चित्त्याने मागे वळून आम्हाला पाहिले.”
या घटनेपुढील किस्सा सांगताना हिटमॅन रोहित म्हणाला की, “तो आमच्या आयुष्यातील सर्वात खास अनुभव होता. सहसा कुणालाही जंगलात फिरण्याची संधी मिळत नाही. आम्हाला तर दोन चित्ते असलेल्या जंगलात फिरण्याची मुभा मिळाली होती. त्या चित्त्यांनी नुकतीच शिकार केली होती. खरे तर, त्यांना मांस खातेवेळी सतावले जात नाही. म्हणून आम्ही शांततेत मागे उभे राहुन त्यांना पाहात होतो. अशात जडेजाने मुद्दाम मागून आवाज करायला सुरुवात केली. त्यामुळे एका चित्त्याचे लक्ष आमच्याकडे वेधले गेले.”
https://youtu.be/Wp9jSDYs8IY
“गुजरातमध्येही जडेजाने असेच काहीसे कृत्य केले होते, ज्यामध्ये सरकारने मध्यस्थी केली होती. खरोखरच जडेजाला आमच्यासोबत घेऊन जाण्याचा निर्णयच चुकीचा होता. त्याला गाडीमध्ये एकटा सोडून यायला पाहिजे होते. जेव्हा त्या चित्त्याने मागे वळून माझ्याकडे पाहिले, तेव्हा मी खूप जास्त घाबरलो होतो. जडेजाला तर मी मारण्याच्याही विचारात होतो,” असे पुढे बोलताना रोहित म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
पृथ्वी शाॅने सोडले मौन; सोशल मीडियावरून टीकाकारांना दिले उत्तर
दुःखद! कोरोनामुळे सचिनच्या जिवलग मित्राचा मृत्यू, एकेकाळी सोबत खेळले होते क्रिकेट
“महिला क्रिकेटविषयी बीसीसीआयमध्ये स्पष्टतेचा अभाव”; माजी महिला क्रिकेटपटूने मांडले परखड मत