भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्षी इंग्लंड दौऱ्यावर एक कसोटी सामना खेळण्याची शक्यता आहे. याला दोन्ही क्रिकेट मंडळांनी या निर्णयास दुजोरा दिला असल्याचे समजत आहे. हा कसोटी सामना ‘ओल्ड ट्रॅफर्ड’ येथील रद्द झालेल्या पाचव्या कसोटीची जागा घेईल. यावर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारतीय संघाने इंग्लंडमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली होती. ४ कसोटी सामन्यांनंतर भारतीय संघ मालिकेत २-१ ने पुढे होता. मात्र भारतीय संघात कोविड -१९ ची प्रकरणे समोर आल्यानंतर पाचवी कसोटी पुढे ढकलण्यात आली होती. आता तीच पाचवी कसोटी पुढील वर्षी होणार असल्याचे वृत्त पुढे येत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, पुढील वर्षी रद्द झालेली पाचवी कसोटी होईल. दोन्ही संघांनी या बातमीस दुजोरा दिला आहे. हा सामना त्याच मालिकेचा एक भाग असेल किंवा स्वतंत्रपणे एक कसोटी सामना असेल. पण या सामनाचे मुख्य उद्दिष्ट इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाला झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई करून देणे असेल. बीसीसीआय देखील हाच प्रयत्न करेल. ईसीबी आणि बीसीसीआयमधील मतभेद दूर करण्यासाठी या कसोटी सामन्याची मदत होईल.
भारत मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी पुढील वर्षी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यापूर्वी असे म्हटले जात होते की, रद्द झालेल्या कसोटीऐवजी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर २ अतिरिक्त टी -२० सामने खेळेल. यामुळे त्या ईसीबीच्या नुकसानीची भरपाई करणे सोपे झाले असते. परंतु कसोटीसाठीचे वेळापत्रक मान्य झाल्याचे समजते आहे. जर ही कसोटी झाली तर यामुळे इंग्लड भारत यांच्यातील खंडित झालेली मालिकाही पूर्ण होईल, ज्यामध्ये भारत २-१ ने पुढे आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटींच्या मालिकेत जबरदस्त कामगिरी केली आहे. मालिकेतील पहिला सामना नॉटिंगहॅममध्ये अनिर्णित राहिला होता. यानंतर भारतीय संघ लॉर्ड्सवर अजिंक्य ठरला. मात्र, इंग्लंडने लीड्समध्ये तिसरी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी केली होती. यानंतर भारताने साऊथम्प्टनमध्ये चौथी कसोटी दणदणीत विजय मिळवला होता. यासह भारतीय संघाने मालिकेत २-१ ने आघाडी घेतली होती. पाचवी कसोटी मँचेस्टरमध्ये होणार होती, पण दुर्दैवाने ती होऊ शकली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
षटकार सोडा, साधा चौकारही नाही; राजस्थानची पावरप्लेमध्ये इतिहासातील दुसरी सर्वात ‘वाईट’ कामगिरी
बुढ्ढे में है दम! वयाच्या ४२ व्या वर्षीही ख्रिस गेलने रचला इतिहास, मोडला द्रविडचा अनोखा विक्रम