बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात पहिला वनडे सामना रविवारी (4 डिसेंबर) ढाका येथे खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. भारतीय फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे संघाला केवळ 186 धावा करता आल्या. या सामन्यात भारतीय संघासाठी युवा वेगवान गोलंदाज कुलदीप सेन याने पदार्पण केले. मागील आठ महिन्यात वेगाने प्रगती करत त्याने हा पल्ला गाठला आहे.
या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी मदार ही पूर्णपणे युवा खेळाडूंच्या खांद्यावर आहे. पहिल्या सामन्यात दीपक चहर व मोहम्मद सिराज यांच्यासह कुलदीप सेन यांना पदार्पण करण्याची संधी दिली गेली. तो भारताचा 250 व्या क्रमांकाचा वनडे क्रिकेटपटू ठरला. मागील आठ महिन्याचा काळ हा कुलदीप याच्यासाठी निश्चितच लक्षात राहण्यासारखा आहे.
मध्य प्रदेशसाठी मागील दोन वर्षापासून कुलदीप सातत्याने चांगली कामगिरी करत होता. यावर्षी आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल संघाने त्याची पारख करत त्याला आपल्या संघात निवडले. कुलदीपने ही निवड सार्थ करताना चांगल्या फलंदाजांना जेरीस आणले. यादरम्यान त्याचा वेग व अचूक टप्पा हा चर्चेचा विषय ठरला. आयपीएलमधील शानदार कामगिरीमुळे त्याची टी20 विश्वचषकात भारतीय संघाचा नेट बॉलर म्हणून निवड झाली. त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर त्याला संघातही स्थान मिळाले. मात्र, तेव्हा तो पदार्पण करू शकला नाही. मात्र, बांगलादेश दौऱ्यावर वनडे मालिकेआधी झालेल्या 4 दिवसीय सामन्यात त्याने उत्कृष्ट खेळ सादर केला. कर्णधार रोहित शर्माच्या हस्तेच त्याला भारतीय संघाची कॅप प्रदान केली गेली.
(Kuldeep Sen Debut For India In ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबाद एफसी विजयी मार्गावर परतण्यासाठी चेन्नईयन एफसीला भिडणार
शाकिबच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांचे लोटांगण, विजयासाठी बांगलादेशला दिले 187 धावांचे लक्ष्य