कराची| पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू झहीर अब्बास यांनी राष्ट्रीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्ता मिस्बाह-उल-हकला सल्ला दिला आहे. जर त्याला यशस्वी व्हायचे असेल तर या दोन जबाबदाऱ्यापैकी फक्त एक जबाबदारी त्यानी स्वीकारली पाहिजे.
ही बाब अधीक स्पष्ट करताना झहीर म्हणाले की, “मी एकाच वेळी दोन प्रमुख पदे स्वीकारणार नाही कारण यामुळे तुमच्यावर खूप दबाव येतो. व्यावसायिक क्रिकेट हा सोपा खेळ नाही. मला वाटते की मिस्बाहने स्वतः निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. खराब कामगिरीनंतर कोणालाही निमित्त ऐकायचे नाही.”
इंग्लंड दौर्यावर संघाच्या कामगिरीबद्दल निराशा व्यक्त करताना झहीर म्हणाले, “पहिल्या डावात मोठी आघाडी घेतल्यानंतर कमकुवत संघच कसोटी गमावतात. असे वाटत होते की पाकिस्तान संघाने इंग्लंडला विजय (पहिला कसोटी विजय) एक भेटवस्तू म्हणून दिला. त्या सामन्यात इंग्लंडने आमच्यातील कमकुवतपणा उघडकीस आणला. आम्ही अद्याप कसोटीत योग्य संयोजन आणि खेळाडू शोधण्यासाठी धडपडत आहोत.”
तसे, या दिग्गज खेळाडूच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. यापूर्वीही अलीकडेच पाकिस्तानच्या माजी बड्या स्टार्सनी मिस्बाहला दोन मोठ्या पोस्ट देण्याची खिल्ली उडवली होती. शोएब अख्तर यांनी असे म्हटले होते की, “मिस्बाह यांना पीसीबीचे अध्यक्ष केले जावे.”
महत्त्वाच्या बातम्या –
यंदा ‘ही’ धावसंख्या आयपीएलमध्ये ठरणार आव्हानात्मक; या दिग्गजाचा दावा
इंग्लंडला मिळाला १० वा टी२० कर्णधार, मॉर्गन ऐवजी या खेळाडूने केले नेतृत्व
…म्हणूनच चेतेश्वर पुजाराला आयपीएल लिलावात खरेदीदार न मिळण्याचे दु:ख नाही
ट्रेंडिंग लेख –
३ अष्टपैलू खेळाडू जे आयपीएल २०२० मध्ये स्वतःला ‘फिनिशर’ म्हणून करु शकतात सिद्ध
आयपीएल संघांची चिंता वाढली; टी२० मालिकेत ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे हे ५ खेळाडू झाले फ्लॉप
रैना आणि हरभजनच्या अनुपस्थितही चेन्नई सुपर किंग्ज जिंकू शकेल आयपीएल; ही आहेत ३ कारणे