दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्स पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीसीएल) 2019 च्या चौथ्या मोसमात खेळणार आहे.
याबद्दल पीसीएलच्या सोशल मिडिया हँडेलवरुन माहिती देण्यात आली. त्यांनी ट्विट केले आहे की “दक्षिण आफ्रिकेचा सार्वकालीन सर्वोत्तम खेळाडू एबी डिविलियर्स पीसीएलचा भाग बनणार आहे. त्याचे स्वागत आहे.”
BREAKING: The GOAT from South Africa is now a part of PSL! A warm welcome to @abdevilliers17
#ABaurPSL pic.twitter.com/0oiSjPSEOZ— PakistanSuperLeague (@thePSLt20) September 7, 2018
त्याचबरोबर डिविलियर्सनेही सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर करत याला पुष्टी दिली आहे. त्याने म्हटले आहे की “पाकिस्तान सुपर लीग जगातील अव्वल टी20 स्पर्धांमध्ये गणली जाऊ लागली आहे. मागील काही वर्षांपासून मी पीसीएलच्या सामने पाहण्याचा आनंद घेतला आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला ‘मला आनंद आहे पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्याचा.’
It’s time for @thePSLt20. So, there’s going to be a party in February?#ABaurPSL #psl2019 pic.twitter.com/WPWo1t9ABB
— AB de Villiers (@ABdeVilliers17) September 7, 2018
डिविलियर्सने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण त्याचबरोबर त्याने टी20 लीगमध्ये खेळत राहणार असल्याचेही सांगितले होते.
त्याच्या पीएसएल समावेशाबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मानी म्हणाले की तरुण खेळाडूंना त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळेल.
तसेच ते म्हणाले ‘आम्हाला डिविलियर्सचा पाकिस्तान प्रीमियरलीगमध्ये समावेश करताना आनंद होत आहे.’
मानी पुढे म्हणाले, “तो आधूनिक काळातील दिग्गज खेळाडू आहे. त्याच्यामुळे स्पर्धेला आणखीनच महत्त्व प्राप्त होईल. त्याच्या समावेशाने तरुण खेळाडूंना त्याच्याकडून शिकण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.”
पाकिस्तान प्रीमीयर लीग ही फेब्रुवारी-मार्च महिन्यात खेळवली जाते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–का झाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुलगी सारासाठी भावूक?
–इंडिया ब्ल्यू संघाने जिंकले दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद
–सेरेना विल्यम्स खेळणार नवव्यांदा युएस ओपनच्या अंतिम फेरीत