भारत अ संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध चार दिवसीय सामना खेळत आहे. या अनधिकृत कसोटी सामन्यात पाहुण्या संघाचा आघाडीचा फलंदाज जो कार्टरने 197 धावांची शानदार खेळी केली. या दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने न्यूझीलंड संघाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्यासाठी आपला पंजा उघडला आणि आता भारतीय फलंदाज अभिमन्यू ईश्वरनही आपल्या फलंदाजीने न्यूझीलंडला सडेतोड उत्तर देताना दिसत आहे.
डेहराडूनचा रहिवासी असलेला ईश्वरन कर्णधार प्रियांक पांचालसह डावाची सलामी देण्यासाठी आला. न्यूझीलंडच्या 400 धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडिया अ ची सुरुवात चांगली झाली, अभिमन्यू ईश्वरनने शतक झळकावून न्यूझीलंडच्या गोलंदाजांना अडचणीत आणले. ईश्वरनचे हे 15 वे प्रथम श्रेणीतील शतक आहे. त्याने 194 चेंडूत 13 चौकारांसह 1 षटकाराच्या मदतीने 132 धावांची खेळी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. याशिवाय संघाचा सलामीवीर प्रियांक पांचाळने 47 धावांची खेळी करत ईश्वरनसोबत शतकी भागीदारी केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचे रवी चमकणार! प्लेइंग 11मध्ये होणार ‘हे’ बदल
विरुष्काचा फोटो वॉर्नरची कमेंट आणि ट्रोलिंग नंतरचं स्पष्टीकरण! वाचा काय आहे प्रकरण
VIDEO | दम वाढवण्यासाठी विराटची ट्रीक, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी खास मास्क घालून केला सराव