आज दिनांक 20 एप्रिल 2023 पासून प्रमोशन फेरीतील सामन्याना सुरुवात झाली. ‘अ’ गटातील टॉप 4 तर ‘ब’ गटातील टॉप 4 असे एकूण 8 संघ एकमेकांशी भिडणार आहेत. पहिला सामना अहमदनगर पेरियार पँथर्स विरुद्ध पुणे पलानी टस्कर्स यांच्यात झाला. पहिल्या 5 मिनिटांतच अहमदनगर संघाने पुणे संघाला ऑल आऊट करत 10-1 अशी आघाडी मिळवली.
अहमदनगर संघात आगमन झालेल्या आदित्य शिंदे ने चढाईची धुरा सांभाळली. तर अभिषेक पवार व अजित पवार बचावफळी सांभाळताना दिसले. मध्यंतराला 1 मिनिटं शिल्लक असताना अहमदनगरच्या प्रफुल झवारे ने सुपर रेड करत पुणे संघाला ऑल आऊट केले. मध्यांतरला अहमदनगर संघाकडे 27-09 अशी भक्कम आघाडी होती.
मध्यांतर नंतर ही अहमदनगर संघाने आपला आक्रमक खेळ सुरू ठेवत आघाडी वाढवत नेली. अहमदनगर ने 61-23 असा विजय मिळवत प्रमोशन फेरीत जोरदार सुरुवात केली. आदित्य शिंदे ने चढाईत 13 गुण तर प्रफुल झवारे ने चढाईत 11 गुण मिळवले. पकडीत संकेत खलाटे ने 8, अभिषेक पवार ने 5 पकडी व अजित पवार ने 4 पकडी सामना एकतर्फी केला. (Ahmednagar Periyar Panthers get off to a winning start in the promotion round)
बेस्ट रेडर- आदित्य शिंदे, अहमदनगर पेरियार पँथर्स
बेस्ट डिफेंडर- संकेत खलाटे, अहमदनगर पेरियार पँथर्स
कबड्डी का कमाल- अनुज गावडे, पुणे पलानी टस्कर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल 556 दिवसांनी कर्णधार म्हणून मैदानावर उतरताच कोहलीचा ‘विराट’ पराक्रम! रोहित-धोनी राहिले कोसो दूर
VIDEO । डायरेक्ट हिटच्या बाबतीत सिराजने दिली विराटला टक्कर! पंजाबचा मध्यक्रमातील फलंदाज स्वस्तात बाद