fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

रांची कसोटीत अजिंक्य रहाणेचे शानदार शतक पूर्ण!

रांची। जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने शतकी खेळी केली आहे.

त्याने 169 चेंडू खेळताना 14 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने त्याचे कसोटी क्रिकेटमधील 11 वे शतक पूर्ण केले आहे.

या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावाची 58 व्या षटकापासून 3 बाद 224 धावांवरुन पुढे खेळायला सुरुवात केली.

आज सुरुवातीला रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेच्या जोडीने दक्षिण आफ्रिकेला मोठे यश मिळू दिलेले नाही. या दोघांनी मिळून पहिल्या डावात चौथ्या विकेटसाठी नाबाद द्विशतकी भागिदारी रचली आहे. तसेच रोहितनेही 140 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

You might also like