आयपीएल 2023मध्ये अजिंक्य रहाणे जबरदस्त प्रदर्शन करत आहे. रहाणेने चालू आयपीएल हंगामातील आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत आणि 189.83च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. आयपीएलपूर्वी त्यने देशांतर्गत हंगामातून चांगल्या फॉर्ममध्ये पुनरागमन केले होते. रहाणेचे या प्रदर्शनासाठी सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. अशातच पाकिस्तानचा माजी दिग्गज वसीम अक्रम यांनी रहाणेला सीएसकेचा पुढचा कर्णधार म्हणून प्रधान्य दिले आहे.
एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघ आतापर्यंत चार आयपीएल ट्रॉफी जिंकला आहे. मात्र, यावर्षी धोनी आयपीएलमधूनही निवृत्त होण्याची शक्यता आहे. 41 वर्षीय धोनी मागच्या काही वर्षांपासून आयपीएलमधून निवृत्त होणार, अशा चर्चा सुरू आहेत. पण यावर्षी धोनी प्रत्यक्षात हा निर्णय घेऊ शकतो. कारण त्याच्या इच्छेप्रमाणे धोनीला यावर्षी आपले होम ग्राउंड चेन्नईमध्ये निवृत्तीची संधी मिळत आहे. धोनीने निवृत्ती घेतली, तर सीएसकेपुढे पुढच्या आयपीएल हंगामात कर्णधारपदाचा प्रश्न उपस्थित राहणार आहे. अशीत अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सीएसकेचे नेतृत्व करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे, असे मत वसीम अक्रम (Wasim Akram) यांना माडले.
एका माध्यमाशी बोलताना वसीम अक्रम म्हणाले, “मागच्या वर्षी सीएसकेने रविंद्र जडेजाला कर्णधार म्हणून आजमावून पाहिले, पण या जबाबदारीमुळे त्याच्या वैयक्तिक प्रदर्शन खालावले. कर्णधारपदासाठी सध्या रहाणेपेक्षा चांगला पर्याय सीएसकेकडे आहे, असे मला वाटत नाही. पहिले तर तो मायदेशातील खेळाडू आहे आणि त्याच्या प्रदर्शनात सातत्य आहे. अशा लीग्जमध्ये मायदेशातील कर्णधारांना अधिक यश मिळाले आहे. दोन महिन्यांसाठी येणाऱ्या विदेशी कर्णधारांना खेळाडूंची नावेही माहिती नसतात. अशात ते नेतृत्व कसे करू शकतात. धोनीने निवृत्ती घेतली, तर माझ्या मते रहाणे सीएसकेचा पुढचा कर्णधार पाहिजे. बाकी संघाने त्यांना काय करायचे आहे, हा विचार केलाच असेल.”
दरम्यान, आयपीएलचे मागचे तीन हंगाम कोरोनाच्या करणास्तव भारताच्या बाहेर खेळवले गेले. अशात धोनीला आपल्या होम ग्राउंडवर एकही सामना खेळला नाही. पण यावर्षी मात्र सीएसकेला आपल्या होम ग्राउंडवर खेळायचे आहे. अशात दोनी आपल्या चाहत्यांसमोर आयपीएल निवृत्तीही घोषित करू शकतो. (Ajinkya Rahane is the best choice for CSK captaincy after MS Dhoni, says Wasim Akram)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईच्या ताफ्यात इंग्लंडच्या घातक वेगवान गोलंदाजाची एन्ट्री, बदली खेळाडू म्हणून मिळाली संधी
“आता अक्षरला दिल्लीचा कर्णधार बनवा”, भारतीय दिग्गजाची वॉर्नरच्या नेतृत्वावर नाराजी