नुकताच पर्थमध्ये जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवलेला 295 धावांचा विजय हा भारताचा परदेशातील आतापर्यंतचा सर्वोत्तम विजय आहे. माजी कर्णधार म्हणाला, “या विजयाची इतिहासात नक्कीच नोंद होईल. मला विश्वास आहे की हा भारताचा सर्वकालीन सर्वोत्तम विजय आहे. आणि कदाचित त्याची नोंदही व्हायला हवी.” भारताने 2021 मध्ये गाब्बासह परदेशात अनेक विजय नोंदवले असले तरी, पॉन्टिंगचे या विषयावर वेगळे मत आहे.
पाँटिंग म्हणाला, “पर्थमध्ये रोहित नव्हता, गिल नव्हता. आणि मोहम्मद शमीही नव्हता. हे लक्षात घेता, हा खूप अप्रतिम विजय आहे.” भारताचा पहिल्या डावात 150 धावांवर बाद होणे ही कमी धावसंख्या होती. हा नक्कीच आश्चर्यकारक विजय होता. आणि ते जवळपास तीनशे धावांनी जिंकले. हे खूप आश्चर्यकारक आहे. पुढे पाँटिंग म्हणाला, “पर्थमध्ये नाणेफेकचा फायदा खूप महत्वाचा होता. त्यावेळीही मी असे म्हणालो होतो. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम फलंदाजी करेल हा इतिहास आहे. प्रत्येक वेळी योगायोगाने या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाने पाच पैकी चार कसोटी जिंकल्या.”
पुढे बोलताना माजी कर्णधार म्हणाला, ‘बुमराहने विजयाचे नेतृत्व केले यात शंका नाही. पहिल्या डावात त्याने केलेली गोलंदाजी उत्कृष्ट होती. शमी तिथे नव्हता हे तुम्हाला आधीच माहीत आहे. अशा परिस्थितीत त्याला आघाडीतून नेतृत्व करावे लागले. आणि कर्णधार म्हणून त्याने ते केले. बुमरानने आपल्या नेतृत्वाच्या जोरावर मैदानात ही कामगिरी केली’.
दरम्यान आता बाॅर्डर गावस्कर मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबर रोजी होणार आहे. या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसरा दिवस रात्र कसोटी सामना आहे. जो की, गुलाबी चेंडूने खेळवला जाईल.
हेही वाचा-
पाकिस्तानला धक्का! इंग्लंड क्रिकेटपटूंचा पीएसलमध्ये सहभाग घेण्यास नकार; मोठे कारण समोर
दुसऱ्या कसोटीसाठी दोन प्राणघातक गोलंदाज ऑस्ट्रेलियन संघात सामील, एकाचा फिलिप ह्यूजशी संबंध
केन विल्यमसननं रचला इतिहास, न्यूझीलंडसाठी अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज