सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) आशिया चषक खेळला जात आहे. साखळी फेरीत भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान व श्रीलंका यांनी विजय मिळवत सुपर फोरमध्ये प्रवेश केला. साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफर याने एक मोठे विधान केले आहे.
आशिया चषकातील अखेरचा साखळी सामना पाकिस्तान व हॉंगकॉंग यांच्या दरम्यान खेळला गेला. पाकिस्तानने अक्षरशा या सामन्यात हॉंगकॉंगची वाताहात करत तब्बल 155 धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यानंतर एका क्रिकेट संकेतस्थळाच्या कार्यक्रमात बोलताना भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफर याने अतिशय महत्त्वाचे विधान केले. जाफर म्हणाला,
“आशिया चषक ही मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत पाच अव्वल संघ खेळले तर, हाँगकाँग हा एकमेव सहयोगी संघ होता. मात्र, पाकिस्तानने हॉंगकॉंगचा दारुण पराभव केला. मला विचाराल तर मी सांगेन की, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या समुद्र तटावरील देशांना देखील आशिया चषकात खेळायला परवानगी द्यायला हवी. त्यामुळे स्पर्धेतील चुरस आणखी वाढेल.”
साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात पाकिस्तानने 193 धावांची मजल मारली होती. त्यानंतर गोलंदाजीला आल्यानंतर त्यांनी हाँगकाँगला केवळ 38 धावांवर सर्वबाद केले. पाकिस्तानचा हा टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय आहे.
आशिया चषक 2022 मध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान व बांगलादेश या संघांना थेट प्रवेश मिळाला होता. तर हाँगकाँग, सिंगापूर, कुवेत व युएई या संघांमध्ये एका जागेसाठी पात्रता फेरी रंगली. यात हॉंगकॉंगने सरशी साधली. आशिया चषकाची अंतिम फेरी 11 सप्टेंबर रोजी खेळली जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताच्या पठ्ठ्याने न्यूझीलंडविरुद्ध झळकावले शानदार शतक! 400 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमदार सुरुवात
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचे रवी चमकणार! प्लेइंग 11मध्ये होणार ‘हे’ बदल
विरुष्काचा फोटो वॉर्नरची कमेंट आणि ट्रोलिंग नंतरचं स्पष्टीकरण! वाचा काय आहे प्रकरण