पाकिस्तान क्रिकेट संघाचा मागच्या काही दिवसांपासून मोठे फेरबदल होताना दिसले आहेत. आता कर्णधार बाबर आझम याचे काही आपत्तिजनक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता त्याच्याकडे असलेले संघाचे कर्णधारपद जाणार, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
बाबर आझम (Babar Azam ) मागच्या काही महिन्यांपासून अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये. मागच्या वर्षी टी-20 विस्वचषक आणि मायदेशातील काही महत्वाच्या माहिलांमध्ये पाकिस्तान संघ पराभूत झाला. संघाच्या सुमार खेळीमुळे बाबरकडून संघाचे कर्णधारपद काढून घेतले जाणार असल्याच्या चर्चा मागच्या काही महिन्यापासून सुरू आहेत. अशातच आता तो हनी ट्रॅप (Honey Trap) मध्ये अडकल्याचा प्रकार समोर येत आहे. व्हायरल व्हिडिओत बाबर त्यांच्या शर्टलेस दिसत असून एका महिलेसोबत व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर बाबर त्याच्या सोशल मीडिया खात्यावरून पब्लिक कमेंट्स बंद केल्या आहेत. नेटकऱ्यांनी त्याच्यावर निशाणा साधायला सुरुवात केल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर शर्टलेस फोटो आणि व्हिडिओ व्हायरल –
व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये बाबर आझम त्याच्या सहकारी खेळाडूच्याच प्रेयसीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असल्याचे सांगितले जात आहे. बाबर सहकाऱ्याच्या प्रेयसीसोबत अश्लील चॅट करत असल्याचा दावा देखील केला जात आहे. या महिलेच्या प्रियकराला संघातून वगळले जाणार नाही, असा शब्द बाबरने दिल्याचे सांगितले जात आहे. पण यासाठी त्याने महिलेला त्याच्यासोबत बोलत राहावे लागेल, अशी अट देखील घातल्याचे सांगतिले जात आहे. असे असले तरी, व्हायरल व्हिडिओतील हा व्यक्त निश्चितपणे बाबर आझमच आहे, याविषयी कुठलीच ढोस माहित अद्याप समोर आली नाहीये. स्वतः बाबरने देखील अजून या प्रकरणातवर भाष्य केले नाहीये. सोशल मीडियावर याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
Yeh Kya challa hai? pic.twitter.com/RbSsq2X9wf
— ✨ (@Kourageous7) January 15, 2023
बाबर आझमविषयी नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
Waah babar azam sahi khel raha ho😭😭😭
— @ (@Meme_Canteen) January 15, 2023
https://twitter.com/AkshatOM10/status/1614704644365905921?s=20&t=pBkL2wtx7xJfElcCWyxaBA
On the Field and Off the field#KingKohli >>>>>>>>> 🔔 ka King
— Mohammad Salman Sam (@imsalmansam) January 15, 2023
Ye kya hai 😯 tharki zimbabar 😂
— Pratham Verma (@prathamverma716) January 15, 2023
(Babar Azam is getting caught in a honey trap)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहलीने केला 166 धावांच्या वादळी खेळीमागचा खुलासा; म्हणाला, ‘हे माझ्या…’
सेंच्युरीनंतर विराटवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव, पण अनुष्काच्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाली…