दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी, आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या दिवशी दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस असतो. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणूनही ओळखला होता. यावर्षी होणाऱ्या या पुरस्कारांसाठी बीसीसीआयने काही खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने भरपूर चर्चा केल्यानंतर भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन आणि महिला संघाची कर्णधार मिताली राज हिची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. तर अर्जुन पुरस्कारासाठी अनुभवी फलंदाज शिखर धवन, केएल राहुल आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांची शिफारस केली आहे. या पुरस्कारांसाठी प्रदर्शनाचा कालावधी १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंतचा आहे. (Bcci nominates r Ashwin and mithali raj for khel ratna award)
मिताली राजने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२ वर्ष पूर्ण केली आहेत. तसेच ती महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे. मिताली राज सध्या भारतीय महिला वनडे आणि कसोटी संघाची कर्णधार आहे. तसेच भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे.
यावर्षी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४०० गडी पूर्ण करण्याचा कारनामा केला होता. तसेच २०१९ ते २०२१ या कालावधीत पार पडलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत तो सर्वाधिक ७१ गडी बाद करणारा गोलंदाज होता. तसेच शिखर धवन, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांनी देखील भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे.
गतवर्षी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याला याल अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. तर महिला महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्माला देखील अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. या यादीमध्ये रवींद्र जडेजा, एमएस धोनी, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे या खेळाडूंचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
नव्या फ्रँचायझींच्या येण्याने बीसीसीआयवर होणार ‘धन वर्षा’, किंमत पाहून फिरतील डोळे
इंग्लंडमध्ये जिंकायचे असेल, तर ‘या’ कर्णधाराकडून घ्यावा ‘गुरुमंत्र’; धोनी-कोहली दोघेही ठरलेत फ्लॉप!
टीम इंडियाला गवसली यशाची किल्ली, बड्या खेळाडूने दिला विजयाचा कानमंत्र