हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) मध्ये बंगळुरू एफसी आणि जमशेदपूर एफसी या दोन्ही संघांना साजेशी कामगिरी करता आलेली नाही. हिरो आयएसएलच्या गुणतालिकेत बंगळुरू आणि जमशेदपूर अनुक्रमे 9 व 10व्या क्रमांकावर आहेत. बंगळुरू येथील श्री कांतीरावा स्टेडियमवर उभय संघांमध्ये शनिवारी डबल हेडरमधील पहिला सामना होणार आहे. दोन्ही संघ प्ले ऑफच्या शर्यतीपासून अजून बरेच दूर आहेत. बंगळुरूच्या खात्यात 7 गुण आहेत, तर जमशेदपूरला 4 गुण कमावता आलेले आहेत.
बंगळुरूला मागील आठवड्यात केरळा ब्लास्टर्स एफसीकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला होता आणि तो त्यांचा सलग दुसरा पराभव ठरला. त्यांना हिरो आयएसएलच्या या पर्वात 9 सामन्यांत केवळ दोन विजय मिळवता आलेले आहेत आणि जमशेदपूर एफसीप्रमाणेच त्यांनीही यंदाच्या पर्वात सर्वात कमी 6 गोल केले आहेत.
मध्यरक्षक झेव्हियर हर्नांडेझने मागील सामन्यात गोल केला आणि यंदाच्या पर्वातील त्याची गोलसंख्या तीन इतकी झाली आहे. कर्णधार सुनील छेत्री यानेही मागील सामन्यात गोल खाते उघडले. संघात नव्याने दाखल झालेला पाब्लो पेरेझ उद्याचा सामना खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे.
”यंदाच्या पर्वात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या दोन संघांमधील हा सामना आहे. फुटबॉल हा सोपा खेळ नाही, याची प्रचिती जमशेदपूर एफसीची कामगिरी पाहून आलीच असेल. ते मागील पर्वातील लीग शिल्ड विजेते आहेत आणि यंदाच्या पर्वात त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. आमच्याही क्लबने भूतकाळात चांगली कामगिरी केली आहे, परंतु मागील काही पर्वात आम्हालाही संघर्ष करावा लागतोय. क्लबच्या कामगिरीचा आलेख चढ-उतारांचा असू शकतो. पण, यंदा आम्ही दोन्ही क्लब चुकीच्या स्थानावर आहोत,”असे बंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक सिमॉन ग्रेसन म्हणाले.
जमशेदपूर एफसी तालिकेत तळावरील स्थानाच्या जवळ आहे. नॉर्थ ईस्ट युनायटेडपेक्षा त्यांच्या खात्यात चार गुण अधिक आहेत. मागील सहा लढतीत जमशेदपूर एफसीला विजय मिळवता आलेला नाही. मागील आठवड्यात एटीके मोहन बागानने त्यांच्यावर 1-0 असा विजय मिळवला. सलग दोन सामन्यांत त्यांना गोल करण्यात अपयश आले.
डॅनिएल चुक्वू 8 सामन्यांत दोन गोल करून क्लबकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. दोन महिन्यांपूर्वी त्याने शेवटचा गोल केला होता. उद्याच्या सामन्यात जमशेदपूरला कर्णधार पीटर हार्टली शिवाय खेळावे लागेल. मागील सामन्यात त्याला लाल कार्ड दाखवले गेले होते.
It's an early kick-off for the Blues on Saturday, who are back in namma Ooru for a clash against the Red Miners. 🔥
🔗 Click here: https://t.co/Gp7SaSiJyv #WeAreBFC #BFCJFC #NothingLikeIt 🔵 pic.twitter.com/A5wHwZqVeR
— Bengaluru FC (@bengalurufc) December 16, 2022
”ग्रेसन हे खूप साचेबद्ध आहेत आणि त्यांचा संघ आक्रमक आहे. मागील अनेक वर्ष आम्ही त्यांना रोखले आहे. उद्याच्या सामन्यातही आमचा सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न आहे. राफेल क्रिव्हेल्लारो उद्याच्या सामन्यात खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचा आनंद आहे. एली साबिया हाही पूर्णपणे तंदुरुस्त आहे,”अशी माहिती मुख्य प्रशिक्षक एडी बूथ्रोयड यांनी दिली.
जमशेदपूर व बंगळुरू यांच्यात हिरो आयएसएलमध्ये दहा सामने झाले आणि त्यात जमशेदपूरने चार विजय मिळवले आहेत. बंगळुरूने तीन विजय मिळवले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आंतरजिल्हा अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा। गतविजेत्या कोल्हापूरसह पुणे संघाची आगेकूच
जसप्रीत बुमराह पुढच्या विश्वचषकात करणार फलंदाजांचा खेळ खल्लास? नेट्समधील व्हिडिओ व्हायरल