टोकियो ऑलिंपिक २०२० च्या चौथ्या दिवशी (२६ जुलै) भारताची चांगली सुरुवात झाली आहे. त्यासोबतच भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सकाळी पार पडलेल्या फेन्सिंग प्रकारात सीए भवानी देवीने इतिहास रचला आहे. ती भारताकडून ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली पहिली महिला बनली होती.
भवानी देवीने आपल्या पहिल्याच सामन्यात विजयाने सुरुवात केली आहे. तिने पहिल्या राऊंडमध्ये ट्युनिशियाच्या नादिया बेन अजीझीवर १५- ३ असा विजय मिळवला आहे. (Bhavani Devi Won R1 Match Against Nadia Ben Azizi In Tokyo Olympics)
Meet Bhavani Devi | Created history by becoming 1st ever Indian Fencer to qualify for Olympics.
She has won R1 match 15-3 & will now take on World No. 3 & part of World Cup winning France team Manon Brunet at 0740 hrs IST.
Proud proud moment. #Tokyo2020withIndia_AllSports pic.twitter.com/VqQdo8anT4— India_AllSports (@India_AllSports) July 26, 2021
आता तिचा पुढील सामना आजच ७.४० वाजता जागतिक क्रमवारीत ३ क्रमांकावर असणाऱ्या आणि विश्वचषक विजेत्या फ्रान्स संघाचा भाग असणाऱ्या मॅनॉन ब्रुनेटशी होणार आहे.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’
-बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, मोठ्या अंतराने प्रतिस्पर्धी पोलिकारपोव्हाला चारली धूळ