भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकदा चमकदार कामगिरी केली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०१२ पदार्पण केले होते. पण तो त्याआधी २००८-०९ च्या रणजी ट्रॉफी दरम्यान प्रकाशझोतात आला होता.
त्यावेळी १९ वर्षांचा असलेल्या भुवनेश्वरने उत्तर प्रदेश कडून रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबई विरुद्ध खेळताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला शुन्यावर बाद केले होते. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सचिनला शुन्यावर बाद करणारा पहिला गोलंदाज ठरला होता. त्या सामन्यात सचिनचा झेल शिवकांत शुक्लाने घेतला होता. या अविस्मरणीय विकेटच्या आठवणी भुवनेश्वरने पुन्हा ताज्या केल्या आहेत.
त्याने युट्यूवरील ‘डबल ट्रबल’ या स्म्रीती मंधना आणि जेमिमा रोड्रिगेज होस्ट करत असलेल्या कार्यक्रमात बोलताना सांगितले, ‘साधारणपण तूम्ही सामना सुरु होण्याच्याआधी विकेट घेण्याचा विचार करता पण तूम्ही किती विकेट घेणार याची योजना आखू शकत नाही. हे शक्य नाही.’
‘पण जेव्हा सचिनच्या विकेटच्या विचार होतो, तेव्हा मी एवढेच सांगेल की मी भाग्यशाली होतो कारण ज्या प्रकारे सचिन बाद झाला त्यावेळी चेंडू शॉर्ट लेगलाही नव्हता आणि मिड विकेटलाही नव्हता. त्यामुळे सर्व श्रेय मोहम्मद कैफचे आहे, तो त्यावेळी माझा कर्णधार होता. त्यानेचे क्षेत्ररक्षण लावले होते. मी केवळ इनस्विंगर टाकला होता आणि मला विकेट मिळाली.’
सचिनची जरी भुवनेश्वरने विकेट घेतली असली तरी तो सामना मुंबईने २४३ धावांनी जिंकत रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले होते. त्या सामन्यात रोहित शर्माने दोन्ही डावात शतकी खेळी केली होती. रोहितने पहिल्या डावात १४१ धावा आणि दुसऱ्या डावात १०८ धावा केल्या होत्या.
ट्रेंडिंग घडामोडी –
‘त्या’ घटनेची माहिती कळताच आफ्रिदीने कारने मध्यरात्रीचं गाठले ते ठिकाण…
हा परदेशातील खेळाडू तासंतास पहातो धोनीच्या फलंदाजीचे व्हीडिओ
इंग्लंडच्या माजी कर्णधाराने सांगितला शाहरुख खानबरोबर सामना पहाण्याचा अनुभव