पराभवाचे खापर फलंदाजांच्या माधी! वाचा केएल राहुलविषयी काय बोलला कर्णधार रोहित शर्मा

पराभवाचे खापर फलंदाजांच्या माधी! वाचा केएल राहुलविषयी काय बोलला कर्णधार रोहित शर्मा

भारतीय संघाला बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अवघ्या एका विकेटने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 186 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने हे लक्ष्य 46 व्या षटकात गाठले. पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा याने फलंदाजांच्या प्रदर्शनाविषयी नाराजी व्यक्त केली, तर गोलंदाजांनी मात्र त्याचे मन जिंकल्याचे पाहायला मिळाले. असे असले तरी, रोहितच्या मते भारतीय संघाला शेवटच्या षटकांमध्ये राहिलेली एक विकेट मिळायला हवी होती. 

पराभवानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “खेळपट्टी फलंदाजांसाठी अवघड होती. चेंडू याठिकाणी टर्न होत होता. हा चेंडू कसा खेळावा, ही गोष्टी तुम्ही समजून घेतली पाहिजे. यात कारणे सांगण्यासारखे काहीच नाहीये, आम्हाला अशा परिस्थितीचा सामना करण्याची सवय आहे. अशा परिस्थितीच फिरकी गोलंदाजांविरुद्ध कशी फलंदाजी करायची याकडे लक्ष द्यावे लागेल. आमचे खेळाडू अशाच परिस्थिती खेळत मोठे झाले आहेत. हे फक्त दबावातून बाहेर पडण्याविषयी आहे.”

केएल राहुल (KL Rahul) याने या सामन्यात शेवटच्या विकेटसाठीचा महत्वपूर्ण झेल सोडला, ज्यामुळे भारताला हातचा सामना गमवावा लागला. असे असले तरी राहुल या सामन्यात संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, ज्यासाठी रोहितने त्याचे कौतुक केले. “संघाची धावसंख्या जास्त नव्हती, पण 30 ते 40 धावा अजून केल्या असत्या, तर अजून फरक पडला असता. केएल राहुल आणि वॉशिंगटन सुंदर यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहचू शकलो. दुर्दैवाने मधल्या षटकांमध्ये आम्ही विकेट्स गमावल्या आणि सामन्यात पुनरागमन करणे नक्कीच सोपे नसते,” असे रोहित म्हणाला.

रोहितच्या मते शेवटच्या काही षटकांमध्ये संघाला एक विकेट मिळाली हवी होती, जेणेकरून भारताला हा सामना जिंकता आला असता. रोहित पुढे बोलताना म्हणाला की, “सामना खूप घासून झाला. आम्ही पुनरागमन करताना चांगले प्रदर्शन केले. फलंदाजांचे प्रदर्सन अपेक्षित नव्हते. पण गोलंदाजी चांगली होती आणि शेवटपर्यंत प्रभाव राहिला. शेवटी दबावाच्या परिस्थितीत देखील त्यांनी संयम राखला. शेवटच्या काही षटकांमध्ये एक विकेट मिळायला हवी होती, पण असे होऊ शकले नाही. मात्र, त्याआधी आम्ही विकेट्स घेत होतो. मला विश्वास आहे, खेलाडू यातून शिकतील आणि पुढच्या सामन्यातील प्रदर्शनावर लक्ष असेल.” (Captain Rohit Sharma expressed displeasure with the poor performance of the batsmen after the defeat against Bangladesh)

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.