रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारताचा कसोटी संघ जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड संघाशी भिडणार आहे. आयपीएल २०२२ हंगामात रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसले. मुंबईला यावर्षी प्लेऑफमध्ये देखील जागा मिळवता आला नाही. मागच्या वर्षी इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिका कोरोनाच्या कारणास्तव स्थगित केली गेली होती, जी यावर्षी पूर्ण केली जाणार आहे. रोहित आता मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी तयारीला लागला आहे.
इंग्लंडविरुद्ध एकमात्र सामना खेळण्याआधी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशातील टी-२० मालिका, तर आयर्लंड दौऱ्यावर २ टी-२० सामने खेळायचे आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma ), विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुल या मालिकेत संघाचे नेतृत्व करेल. ही मालिका ९ जून ते १९ जूनदरम्यान खेळली जाणार आहे. यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर रवाना होईल.
आयपीएल २०२२ मधील निराशाजनक प्रदर्शनानंतर रोहितने काही दिवस त्यांच्या कुटंबीयांसोबत घालवले आणि आता तो मैदानात पुन्हा परतला आहे. चाहत्यांना रोहित आता थेट इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात दिसणार असला, तरी त्याने आतापासून या दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. स्वतःच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे सरावाचा एक फोटो शेअर केला आहे.
Captain Rohit Sharma has started the preparation ahead of the all important England tour. pic.twitter.com/s4e6EXWDup
— Johns. (@CricCrazyJohns) June 5, 2022
Captain Rohit Sharma has started the preparation for England Tour.@ImRo45 | #RohitSharma | #INDVsENG pic.twitter.com/vVxHzXT0lo
— ROHIT TV™ (@rohittv_45) June 5, 2022
दरम्यान, इंग्लंडविरुद्धचा हा कसोटी सामना खास असणार आहे. हा सामना १ जुलै रोजी सुरू होणार असून ५ जुलैपर्यंत खेळला जाणार आहे. इंग्लंडविरुद्ध मागच्या वर्षी झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने चांगले प्रदर्शन केले आहे. मालिकेतील पहिल्या चार सामन्यांपैकी दोन सामने भारताने जिंकले आहेत आणि एक सामना इंग्लंड संघाने जिंकला आहे, राहिलेला एक सामना अनिर्णीत राहिला आहे. आता मालिकेतील हा शेवटचा सामना निर्णायक आहे. भारतीय संघ हा सामना अनिर्णीत जरी करू शकला, तरी मालिका नावावर करेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पृथ्वीचा ‘शो’ काय चालेना! आयपीएलनंतर आता रणजीतही फ्लॉप शो सुरूच
हे भारीये! जेव्हा नदालने जिंकलेले पहिले फ्रेंच ओपन, तेव्हा आजचा उपविजेता होता केवळ ‘इतक्या’ वर्षांचा