अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएलच्या तेराव्या हंगामात संघर्ष करताना दिसत आहे. त्यातही शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) शारजाह येथे मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांचा १० विकेट्सने पराभव झाला. त्यामुळे चेन्नईच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा धुसर झाल्याप्रमाणेच आहेत. मात्र गणिती हिशोबानुसार त्यांच्यासाठी आताही प्ले ऑफचे दरवाजे उघडे आहेत. पण त्यासाठी त्यांना खूप परिश्रम करावे लागणार आहेत.
प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी कराव लागेल हे काम
चेन्नईने आतापर्यंत या हंगामातील ११ सामने खेळले असून त्यातील केवळ ३ सामने जिंकले आहेत. तर ८ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे ६ गुण आणि -०.७३३ नेट रन रेटसह हा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. दूसऱ्या बाजूला गुणतालिकेत टॉप-३ स्थानांवर असलेल्या संघांनी प्रत्येकी ७ सामने जिंकले आहेत. अशात चेन्नईला चौथ्या स्थानावर विराजमान होत, प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.
मात्र त्यासाठी त्यांना हंगामातील उर्वरित ३ सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. त्यांचा नेट रन रेट अतिशय वाईट असल्यामुळे जर त्यांनी एकही सामना मोठ्या फरकाने गमावला. तर त्यांना स्पर्धेतून सरळ बाहेर जावे लागणार आहे.
विजयासह लागेल नशिबाची साथ
चेन्नईला केवळ मोठ्या अंतराने सामने जिंकून चालणार नाही, तर त्यांना कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्यांच्या उरलेल्या ४ सामन्यांपैकी फक्त १ सामना जिंकावा, अशी प्रार्थना करावी लागणार आहे. जर कोलकाताने एकपेक्षा जास्त सामने जिंकले तर, चेन्नईच्या अपेक्षांचा तिथेच भंग होईल. कारण कोलकाताने आतापर्यंत हंगामातील ५ आणि चेन्नईने ३ सामने जिंकले आहेत.
त्यामुळे चेन्नई जास्तीत जास्त ६ सामने जिंकत १२ गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचू शकते. पण जर कोलकाताने एकपेक्षा जास्त सामने जिंकले, तर त्यांचे गुण चेन्नईपेक्षा जास्त होतील. एवढेच नव्हे तर, गुणतालिकेत शेवटच्या ४ स्थानांवर असलेले किंग्स इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांनी जरी त्यांच्या उर्वरित सामन्यांपैकी २ पेक्षा जास्त सामन्याच विजय मिळवला, तरी चेन्नईला हंगामातून बाहेर पडावे लागेल.
अशात उर्वरित सामन्यात चेन्नईचे प्रदर्शन कसे राहिल आणि त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळेल का नाही?, हे पाहणे रोमांचक ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नईविरुद्ध एकहाती सामना जिंकवून देणारा ईशान किशन म्हणतो, ‘त्या’ खेळाडूकडून नेहमीच शिकायला मिळते
‘पॉवरप्लेमध्येच खेळ संपला होता’, मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नईच्या प्रशिक्षकांचे मोठे भाष्य
आज कोलकाता-दिल्ली आणि पंजाब-हैदराबाद येणार आमनेसामने; प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी झुंज
ट्रेंडिंग लेख-
आयपीएलच्या १३ व्या हंगामात धोनीचा चेन्नई संघ झाला फ्लॉप, ही आहेत ३ प्रमुख कारणे
‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला