भारतीय क्रिकेटमधील सर्वात मानाची स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीचा (Ranji Trophy) नवा हंगाम १७ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. तब्बल दोन वर्षांनंतर ही स्पर्धा खेळली जात सध्या राष्ट्रीय संघाचा भाग नसलेले अनेक खेळाडू स्पर्धेत आपले कसब दाखवताना दिसत आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे, उपकर्णधार चेतेश्वर पुजारा व वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा हे देखील यावेळी स्पर्धा खेळताना दिसत आहेत. राष्ट्रीय संघात पुन्हा स्थान बनवायचे असल्यास या स्पर्धेत चांगला खेळ या खेळाडूंना करावा लागणार आहे. अजिंक्य रहाणे याने पहिला दिवस गाजवल्यानंतर सर्वांच्या नजरा चेतेश्वर पुजारावर होत्या. मात्र, तो येथेदेखील अपयशी ठरला.
खाते खोलू शकला नाही पुजारा
राष्ट्रीय संघात सातत्याने खराब कामगिरी केल्यामुळे चेतेश्वर पुजारा याला भारतीय संघातून वगळले जाणे जवळपास निश्चित आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी खराब फॉर्ममध्ये असलेल्या पुजारा व रहाणे यांना रणजी ट्रॉफीमध्ये धावा कराव्या लागतील, असे सूचक वक्तव्य केले होते. लवकरच भारतीय संघाची श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड होणार आहे. या मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी देण्याचा विचार बीसीसीआय करतेय.
भारतीय संघातील आपले स्थान जवळपास गमावलेला पुजारा सौराष्ट्रासाठी रणजी खेळत आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणे येथे देखील तो अपयशी ठरला. मुंबई विरुद्ध सौराष्ट्र या सुरू असलेल्या सामन्यात सौराष्ट्राच्या पहिल्या डावात चार चेंडू खेळून एकही धाव न करता तो माघारी परतला. त्यामुळे त्याच्यावरील टीकेला अजूनच धार मिळाली आहे.
रहाणेने दाखवला दम
ज्या सामन्यात पुजारा अपयशी ठरला त्याच सामन्यात मुंबईसाठी खेळताना अजिंक्य रहाणे हा यशस्वी ठरला. त्याने मुंबईसाठी पहिल्या डावात शानदार शतकी खेळी केली. त्यामुळे, पुजारावर आणखी दबाव वाढला आहे.
महत्वाच्या बातम्या-
पॉवेल फटकेबाजी करताना खूश होत होता पंत! वाचा संपूर्ण प्रकरण (mahasports.in)
रोहितने विराटचा ‘तो’ सल्ला ऐकला आणि विजयाचा मार्ग झाला सुकर (mahasports.in)