भारत आणि भारताबाहेर सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे भारतीय संघाचा स्ट्राक कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने साता समुद्रापार शतक ठोकले आहे. पुजाराने नुकतेच काउंटी क्रिकेटमध्ये ससेक्सचा नियमित कर्णधार बनला आहे. कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यात पुजाराने शतक ठोकले डब्ल्यूटीसाच्या अंतिम सामन्यासाठी आपली दावेदारी ठोकली आहे.
डरहम आणि ससेक्स (Durham vs Sussex) यांच्यातील हा काउंटी सामना गुरुवारी (6 एप्रिल) सुरू झाला. डरहमने पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना 376 धावा केल्या. प्रत्युत्तरात ससेक्सची सुरुवात मात्र अपेक्षित होऊ शकली नाही. ससेक्सची धावसंख्या 44 असताना संघाने सुरुवातीच्या दोन महत्वपूर्ण विकेट्स गमावल्या. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) फलंदाजीला आला. पुजाराने 163 चेंडूंचा सामना केला आणि 115 धावा कुटल्या. यादरम्यान पुजाराने 13 चौकार आणि 1 षटकार ठोकला. त्याने ओलिवर कार्टरसोबत मिळून पाचव्या विकेटपर्यंत संघाची धावसंख्या 300 धावांपार नेली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ससेक्सने 9बाद 332 धावा केल्या. पुजाराची ही खेळी संघाला आवश्यकता असल्याने या शतकाचे महत्व अधिकच वाढले आहे.
दरम्यान, तुकतीच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका पार पडली. बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाने एक तर भारताने दोन विजय मिळवले. भारताने ही मालिका जिंकली, पण पुजारा मात्र अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. त्याने या मालिकेत खेळलेलेल्या 6 डावांमध्ये 7, 0, 31*, 1, 59 आणि 42 अशी खेळी केली. ही मालिका संपल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे संघ देखील निश्चित झाले. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी डब्ल्यूटीसाच्या अंतिम सामन्यात स्थान पक्के केले आहे. हा सामना 7 जून पासून लंडनच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ससेक्ससाठी ठोकलेल्या या षटकातनंतर पुजाराने डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठीही आपली दावेदारी ठोकली आहे. अशात भारतीय संघ व्यवस्थापन त्याला अंतिम सामन्यात खेळण्याची संधी देणार की नाही? हे पाहावे लागणार आहे. (Cheteshwar Pujara’s century for Sussex)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महत्वाच्या सामन्याआधी मुंबईसाठी धोक्याची घंटा! प्रमुख खेळाडूच्या दुखापतीचे संकेत
हैदराबादचे पराभवाचे सत्र सुरूच, राहुलसेनेचा 5 विकेट्सने दणदणीत विजय; लखनऊ संघ गुणतालिकेतील टॉपर