मुंबई । वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांच्या सासऱ्यांचे निधन झाल्यानंतर ते अंत्यसंस्कारासाठी गेले होते. त्यानंतर वेस्ट इंडिजमधील एका क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षांनी फिल सिमन्स यांचा राजीनामा मागितला होता. मात्र गुरुवारी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी त्यांना प्रशिक्षक पदावरून हटवणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
शुक्रवारी फिल सिमन्स यांच्या सासऱ्यांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांनी ओल्ड ट्रॅफर्ड येथील हॉटेलमध्ये स्वतःला आयसोलेट करून घेतले होते. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने त्रिनिदादचे फिल सिमन्स यांना अंत्यविधीला हजर राहण्यासाठी परवानगी दिली होती. तरीही बार्बाडोस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांनी त्यांना प्रशिक्षक पदावरून हटवण्याची मागणी केली होती.
बार्बाडोस क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख कॉनडे रिले म्हणाले की,”कोरोना महामारीच्या संकटात अंत्यसंस्काराला जाणे योग्य नव्हते.” तसेच वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रिकी स्केरीट बुधवारी म्हणाले की, “वेस्ट इंडिज क्रिकेट संघाच्या चाहत्यांना मी आश्वासन देतो की, वेस्टइंडीज क्रिकेट बोर्ड फिल सिमन्स यांना पूर्णपणे पाठिंबा देत आहे. त्यांना प्रशिक्षकपदावरून हटवण्यात येणार नाही.”
बुधवारी त्यांचा सलग तिसरा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. काही दिवसांतच ते संघासोबत दिसतील. या पदासाठी ते योग्य व्यक्ती आहेत. अशा घटनेच्या वेळी ते त्यांच्या परिवारासोबत राहणे महत्त्वपूर्ण होते. बुधवारपासून सुरू होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या तयारीवरती याचा कोणताच प्रभाव पडणार नाही, असे बोर्डाचे अध्यक्ष रिकी स्केरिट म्हणाले.
ट्रेंडिंग घडामोडी –
कोहली व गांगुलीच्या कसोटीत जर मॅच झाली तर हा संघ जिंकणार, कारणही आहे तसेच
इरफान पठाणला व्हायचंय दहशतवादी हफिज सईद, पहा कोण म्हणतंय हे
७व्या वर्षी घेतली धोनीकडून प्रेरणा, आज आहे दिग्गज क्रिकेटर व विद्यार्थी क्रीडा संघटनेच्या अध्यक्ष