भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात लंडनच्या के ओव्हल मैदानात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाकडून पहिल्या दिवशी स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेड यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 3 विकेट गमावत 327 धावा चोपल्या होत्या. यात हेडचे शतक आणि स्मिथच्या 95 धावांचा समावेश होता. पहिल्या दिवशी रोहित शर्मा याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, पण दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले. तसेच, हेडला 163 धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर स्मिथची साथ देण्यासाठी यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरे मैदानात आला.
दुसऱ्या दिवशीची पहिली विकेट घेतल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया संघावर दबाव बनवण्यास सुरुवात केली. स्टीव्ह स्मिथ टिच्चून फलंदाजी करत होता, तर ऍलेक्स कॅरे (Alex Carey) याला दबावात टाकण्यासाठी मोहम्मद शमी याच्या हातात चेंडू सोपवला. शमीने कॅरेला सलग 2 चेंडूंवर दबावात टाकले, पण यावेळी रोहित शर्मा याने गंभीरता दाखवण्याऐवजी पंचांसोबत असे काही केले, ज्यामुळे मजा-मस्तीचे वातावरण तयार झाले.
खरं तर, 97व्या षटकातील पाचवा चेंडू कॅरेच्या पॅडवर जाऊन लागला. यावेळी अपील झाली, पण पंचांनी नकार दिला. रोहितनेही रिव्ह्यू घेतला नाही. षटकातील अखेरचा चेंडूही पाचव्या चेंडूसारखाच पडला आणि पुन्हा एकदा पंचांनी अपील नाकारली. आता कॅमेऱ्याचे लक्ष रोहितवर होते, जो मस्तीच्या मूडमध्ये दिसत होता. भारतीय कर्णधाराने रिव्ह्यूचा इशारा जवळपास केला होता, पण सलग त्याने सलग दुसऱ्यांदा रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय घेतला.
झाले असे की, अपील घेतल्यानंतर रोहित रिव्ह्यू घेऊ इच्छित होता, पण त्याला पूर्णपणे खात्री नव्हती. त्यानंतर रोहितने रिव्ह्यूसाठी आपले हात हवेत केले, पण योग्यप्रकारे ‘टी’ (T) साईन बनवला नाही, ज्यामुळे पंचांवरही कोणता फरक पडला नाही. आपल्या कर्णधाराच्या या कृतीवर रवींद्र जडेजा स्वत:ला हसण्यापासून रोखू शकला नाही.
https://www.instagram.com/p/CtOfzfItTba/
ऑस्ट्रेलियाचा डाव
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावत 469 धावा चोपल्या. यामध्ये सर्वाधिक धावांचे योगदान हेडचे राहिले. त्याने 174 चेंडूंचा सामना करताना 163 धावा केल्या. त्यात 1 षटकार आणि 25 चौकारांचा समावेश होता. याव्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथ यानेही 268 चेंडूंचा सामना करत 121 धावा केल्या. इतर एकही फलंदाज अर्धशतक झळकावू शकला नाही. यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स, तर जडेजाने 1 विकेट नावावर केली. (cricketer rohit sharmas drs review gesture leaves fans confused during wtc final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video : सब्स्टिट्यूट म्हणून आला अन् स्टार्कला तंबूत पाठवून गेला, पाहा अक्षर पटेलचा रॉकेट थ्रो
रोहितच्या ‘या’ निर्णयावर संतापले रवी शास्त्री; वाचून तुम्हीही म्हणाल, ‘बरोबर बोललात गुरुजी’