इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसऱ्या ऍशेस कसोटी सामन्यात जॉनी बेअरस्टो याला ऍलेक्स कॅरे याने यष्टीचीत बाद केले होते. या घटनेनंतर क्रिकेट जगतात खिलाडूवृत्ती दुखावण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. असेच काहीसे आता पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. यावरून खिलाडूवृत्तीबाबत चांगलीच खळबळ माजली आहे. क्रिकेट क्लब सामन्यातील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
झाले असे की, शनिवारी (दि. 08 जुलै) यॉर्कशायर प्रीमिअर लीग स्पर्धेत सेसे क्रिकेट क्लब विरुद्ध यॉर्क क्रिकेट क्लब (Sessay Cricket Club vs York Cricket Club) संघात खेळल्या गेलेल्या एका सामन्यात एक घटना घडली. यामुळे पुन्हा एकदा खिलाडूवृत्तीबाबत चर्चेला तोंड फुटले आहे.
सामन्यादरम्यान सेसे क्रिकेट क्लब (Sessay Cricket Club) संघाचा फलंदाज डिएगो रोसियर (Diego Rosier) हा वादग्रस्त पद्धतीने धावबाद झाला. यादरम्यानचा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधत आहे. झाले असे की, डिएगोच्या संघसहकाऱ्याने एक धाव घेत अर्धशतक झळकावले. अशात डिएगो दुसऱ्या बाजूला पोहोचला. ज्यावेळी फलंदाजाने अर्धशतक पूर्ण केले, तेव्हा डिएगोने संघ सहकाऱ्याला अर्धशतकाच्या शुभेच्छा देण्यासाठी नॉन स्ट्रायकर बाजूला जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी तो तोडा गोंधळलेला दिसला.
Error 404 spirit of the game not found? ????♂️ looks like he’s going to congratulate him on 50? Changes his mind then they run him out. Drama pic.twitter.com/5QQbxjHuqa
— The Fat Cricketer???? (@DatFatCricketer) July 8, 2023
खरं तर, ज्यावेळी त्याने एक धाव पूर्ण केली, तेव्हा तो त्याच्या सहकाऱ्याला शुभेच्छा देण्यासाठी लगेच क्रीझ सोडून वेगाने पुढे गेला. अशात यष्टीरक्षकाने आपल्या खेळाडूला लवकर चेंडू टाकण्यास सांगितले. जेव्हा यष्टीरक्षकाने असे केले, तेव्हा डिएगोने लगेच मागे फिरत क्रीझपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुन्हा त्याने क्रीझमध्ये पोहोचण्यापूर्वी मन बदलले आणि सहकाऱ्याकडे जाऊ लागला. यावेळी क्षेत्ररक्षकाने यष्टीरक्षकाकडे चेंडू फेकला आणि हे पाहून फलंदाज घाबरला. तो पुन्हा धावून क्रीझच्या दिशेने जाऊ लागला. मात्र, तोपर्यंत यष्टीरक्षकाने स्टम्प्स उडवले आणि धावबादसाठी अपील केली.
खरं तर, एमसीसी नियम 20.2नुसार, चेंडू डेड झाला आहे की नाही, हे एकट्या पंचांना ठरवायचे असते. त्यामुळे मैदानी पंचांनी आपसात चर्चा केल्यानंतर डिएगोला धावबाद घोषित केले. यावेळी बाद झाल्यानंतर फलंदाज खूपच निराश आणि रागात दिसला. सोशल मीडियावर या व्हिडिओची चर्चा रंगली आहे. (cricketer run out for leaving crease to congratulate fellow batter see video)
महत्वाच्या बातम्या-
‘भारताने घरात खेळो किंवा बाहेर…’, कसोटी मालिकेपूर्वी विंडीजचा दिग्गज ब्रायन लाराचे लक्षवेधी विधान
ऑटोग्राफ मागायला आलेल्या मुलीवरच झाले गावसकरांना प्रेम, वाचा त्यांची प्रेमकहाणी