आयपीएल 2022 पासून चेन्नई सुपर किंग्ज आणि रवींद्र जडेजा यांच्यातील भांडणाच्या अफवा पसरल्या आहेत. यादरम्यान असे अनेक रिपोर्ट्स देखील समोर आले आहेत ज्यात असे म्हटले आहे की जडेजा लवकरच सीएसके सोडू शकतो. दरम्यान, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने जडेजाच्या दुखापतीनंतर एक खास पोस्ट केली आहे. जडेजा दुखापतीमुळे यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया कप 2022मधून बाहेर पडला आहे.
Speedy Recovery, Jaddu! Come back stronger than ever!#AsiaCup2022 #WhistlePodu 🦁💛 @imjadeja pic.twitter.com/zjuKx19eNQ
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 2, 2022
जडेजाच्या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर चाहते त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने पोस्ट केले, “जड्डू लवकर बरा हो! पूर्वीपेक्षा मजबूत पुनरागमन कर” असं लिहीत यात जडेजाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आता सीएसके अन् जडेजामध्ये सुरू असलेल्या वादावर पुंकर मारण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विरुष्काचा फोटो वॉर्नरची कमेंट आणि ट्रोलिंग नंतरचं स्पष्टीकरण! वाचा काय आहे प्रकरण
VIDEO | दम वाढवण्यासाठी विराटची ट्रीक, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी खास मास्क घालून केला सराव
यूएस ओपनच्या तिसऱ्या राउंडमध्येच थांबला टेनिस क्वीन सेरेना विलियम्सचा प्रवास