बर्मिंघममध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये भारतीय क्रिडापटू चमकदार प्रदर्शन करत आहेत. अशात रविवारी (०७ ऑगस्ट) भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने एक पदक निश्चित केले आहे. महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात या २ वेळच्या ऑलिंपिक पदक विजेत्या सिंधूने सिंगापूरच्या जिया मिन हिला पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. उपांत्य सामन्यातील पहिल्या गेममध्ये २१-१९ आणि दुसऱ्या गेममध्ये २१-१७ ने विजय मिळवत तिने अंतिम सामना गाठला आहे.
SINDHU INTO THE FINAL!! 🤩
PV Sindhu defeated Yeo Jia Min (Singapore) 21-19/21-17. With this win she has entered the Finals🤩
Go For GOLD!! 🥇#Cheer4India 🇮🇳#India4CWG2022 pic.twitter.com/deTOYzyLcy
— SAI Media (@Media_SAI) August 7, 2022
सिंधूला उपांत्य सामन्यात प्रवेश करण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला होता. तिने उपांत्यपूर्व सामन्यात मलेशियाच्या गोह वेई जिनला पराभूत केले होते. परंतु ६०व्या रँकिंगच्या या खेळाडूला पराभूत करण्यासाठी तिला घाम फुटला होता. तिने १९-२१, २१-१४ आणि २१-१८ ने हा सामना जिंकला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा