झिम्बाब्वेविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात वेगवान गोलंदाज डेल स्टेनला संधी देण्यात आली होती. दोन वर्षानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या स्टेनने दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी महत्वाची कामगिरी केली आहे.
पुनरागमनाच्या सामन्यातच डेल स्टेनने कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले आहे. त्याने 85 चेंडूचा सामना करताना महत्वपुर्ण 60 धावांची खेळी केली. आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या स्टेनला कारकिर्दीतील पहिले अर्धशतक करण्यासाठी तब्बल 117 डाव खेळावे लागले.
त्याच्या या खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 198 धांवापर्यंत मजल मारली. स्टेन जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 101 धावांवर 7 विकेट पडल्या होत्या. त्याने अँडिल फेहेलुकवे सोबत आठव्या विकेटसाठी 75 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
दक्षिण आफ्रिका संघाची झिम्बाब्वेविरुद्ध 185 ही सगळ्यात कमी धावसंख्या आेलांडण्यात या जोडीला यश आले. दक्षिण आफ्रिका संघाने झिम्बाॅब्वेविरूद्धच्या सलग 28 सामने जिंकले आहेत. त्यांचा शेवटचा पराभव 1999-2000 मध्ये डर्बन येथील सामन्यात झाला होता.
सामना संपल्यानंतर सुपर स्पोर्टसशी बोलताना डेल स्टेनने सांगितले, ”संघ बिकट परिस्थितीत ही खेळी केल्याने आपल्याला आनंद झाला आहे”.
या विजयासह दक्षिण अफ्रिकेने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या
मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना 6 आॅक्टोबरला खेळणार आहे तर 9 आॅक्टोबरपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-