बिग बॅश लीग २०२१ स्पर्धेतील(Big bash league 2021) १६ वा सामना मंगळवारी (२१ डिसेंबर) सिडनीच्या सिडनी क्रिकेट मैदानावर पार पडला. या सामन्यात सिडनी सिक्सर्स आणि ॲडीलेड स्ट्राइकर्स हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. हा सामना सिडनी सिक्सर्स(Adelaide strikers vs Sidney sixers) संघाने जोरदार विजय मिळवला. दरम्यान या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात सिडनी सिक्सर्स संघाचा खेळाडू डॅनियल क्रिश्चनने (Daniel Christian) गोलंदाजी करताना ८ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. याव्यतिरिक्त त्याने मैदानात अप्रतिम क्षेत्ररक्षण करत चाहत्यांचे मन जिंकले. तर झाले असे की, या सामन्यातील दुसरे षटक टाकण्यासाठी सीन अबॉट गोलंदाजीला आला होता. या षटकातील एका चेंडूवर ॲडीलेड स्ट्राइकर्स संघाचा फलंदाज मॅट शॉर्टने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न थोडक्यात फसला.
मॅट शॉर्टने षटकातील शेवटच्या चेंडूवर ऑफ साईडच्या दिशेने शॉर्ट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला नियंत्रित शॉट खेळता आला नाही. ज्यामुळे चेंडू हलका हवेत राहिला आणि ऑफ साईडला क्षेत्ररक्षण करत असलेल्या ३८ वर्षीय डॅनियल क्रिश्चनने डाईव्ह मारली आणि भन्नाट झेल टिपला. हा झेल पाहून फलंदाजासह मैदानात आलेले प्रेक्षक देखील आश्चर्यचकित झाले होते.
https://www.instagram.com/p/CXvaCCGN8Uc/?utm_source=ig_web_copy_link
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात ॲडीलेड स्ट्राइकर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला होता. ॲडीलेड स्ट्राइकर्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना थॉमस केलीने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली होती. तर जॉनाथन वेल्सने ३२ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर ॲडीलेड स्ट्राइकर्स संघाला २० षटकांअखेर ८ बाद १४७ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना सिडनी सिक्सर्स संघाकडून जॉर्डन सिल्कने ३६ धावांची खेळी केली. तर मोईसिस हेनरिक्सने २८ धावांचे योगदान दिले. हा सामना सिडनी सिक्सर्स संघाने ४ गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या:
Video: पाच वर्षांपूर्वी कर्णधार रोहित शर्माने आणले होते वादळ! टी२० मध्ये झळकावले होते वेगवान शतक
पुनरागमनाची आस! फॉर्ममध्ये परतण्यासाठी केकेआरचा ‘हा’ शिलेदार मैदानात गाळतोय घाम, व्हिडिओ व्हायरल
“कपिल देव यांची गोलंदाजी ॲक्शन कॉपी करण्यासाठी ६ महिने करावा लागला ४ तास सराव”
हे नक्की पाहा : आफ्रिदीने विश्वविक्रम केला, तोही सचिनच्या बॅटने