ऑस्ट्रेलियन फलंदाज आणि आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असतो. वॉर्नर अनेक वेळा त्याने केलेल्या पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतो. सध्या वॉर्नर भारतीय महिला हॉकी संघाचे ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन उपांत्य फेरीत प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन केल्यामुळे चर्चेत आला आहे. त्यातच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये वॉर्नर दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
वॉर्नर ‘मास्टर’ नावाच्या चित्रपटातील ‘वाथी कमिंग’ या प्रसिद्ध गाण्यातील थलपती विजय सारखा डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे. वॉर्नरने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन लिहिले की, ‘मला कंटाळा येत होता. मग या मूव्स विचार केला, या गाण्याचे नाव सांगा.’
वॉर्नरने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. वॉर्नरला भारतातून मोठी फॅन फॉलोविंग आहे. तो अनेकदा असे भारतीय चित्रपटातील गाण्यांवरील व्हिडिओ शेअर करत असतो. प्रामुख्याने यात दाक्षिणात्य गाण्यांचा समावेश आहे. वॉर्नर इंडियन प्रीमीयर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो.
https://www.instagram.com/p/CSEVO9bpA9z/
काही दिवसांपूर्वी वॉर्नर आयपीएलबाबत चर्चेत आला होता. खरंतर सूर्यकुमार यादवने त्याची आयपीएलची सर्वकालीन ११ खेळाडूंची निवड केली होती, ज्यात त्याने सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरचा समावेश केला नव्हता.
सूर्यकुमार यादवने राजस्थान रॉयल्सचा यष्टीरक्षक-सलामीवीर जोस बटलर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा या दोघांना सलामीवीर फलंदाज म्हणून निवड केली होती. विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर निवड केली आहे. त्यानंतर सूर्यकुमार यादव स्वतःला आणि एबी डिव्हिलियर्सची पाचव्या क्रमांकावर निवड केली होती.
सूर्यकुमारच्या त्याच्या आयपीएल संघात वॉर्नरला स्थान न दिल्याने, वॉर्नरने ट्विट केले होते की, ‘माझा विश्वास बसत नाही की त्याने मला संघात स्थान दिले नाही.’
वॉर्नर आता युएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आयपीएल २०२१ च्या उर्वरित हंगामात खेळताना दिसू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हा’ भारतीय खेळाडू ठरू शकतो इंग्लंड दौऱ्यात ‘हुकुमी एक्का’, ऑसी दिग्गजाचा दावा