सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात गुरुवारी आयपीएलचा २२वा सामना पार पडला. या सामन्यात हैदराबादचे सलामीवीर डेविड वॉर्नर व जॉनी बेयरस्टोने धमाकेदार शतकी सलामी दिली. तसेच या सामन्यात अर्धशतक करत वॉर्नरने सर्वाधिक वेळा आयपीएलमध्ये ५० किंवा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे.
वॉर्नरने आयपीएल कारकिर्दीत १३२ सामन्यात तब्बल ४६ वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. तर ४ वेळा त्याने शतकाला गवसणी घातली आहे. यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिक ५० वेळा ५० किंवा अधिक धावा करण्याचा खास कारनामा त्याने केला आहे.
वॉर्नरपाठोपाठ या यादीत रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीचा समावेश आहे. कोहलीने १८२ सामन्यात ४२ वेळा हा कारनामा केला आहे. यात कोहलीच्या ३७ अर्धशतक व ५ शतकांचा समावेश आहे.
तत्पर्वी आज जॉनी बेयरस्टोबरोबर सलमीला फलंदाजीला आलेल्या वॉर्नरने १६० धावांची भागीदारी रचली. यात ९७ धावा जॉनी बेयरस्टोने केल्या होत्या, तर वॉर्नरच्या ५२ धावांचा समावेश होता. आयपीएलमध्ये या जोडीने तब्बल ६ वेळा शतकी भागीदारी रचली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-पंजाबची साडेसाती संपली! तब्बल ३६ ओव्हर व ८ दिवसांनी मिळाली पहिली विकेट, पाहा कसं ते
-‘केदार जाधवला सामनावीराचा पुरस्कार द्या’, चेन्नईच्या पराभवानंतर माजी खेळाडूची खोचक टीका
-केदार जाधवची सीबीआय चौकशी करा, चाहत्यांनी केली अजब मागणी
ट्रेंडिंग लेख-
-यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ ३ संघांकडे आहे सर्वोत्तम गोलंदाजीचे आक्रमक
-IPL2020 – या ६ युवा खेळाडूंनी केले सर्वांना प्रभावित, लवकरच मिळू शकते टीम इंडियाकडून खेळण्याची संधी
-IPL – एकही विकेट न गमावता सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारे संघ