रासी वान डर डुसेन दक्षिण अफ्रिका संघासाठी एक महत्वाचा खेळाडू बनला आहे. टी-२० विश्वचषकात शनिवारी (६ नोव्हेंबर) इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका संघ आमने सामने होते. यामध्ये डुसेनने केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने इंग्लंडला १० धावांनी पराभूत केले. डुसेनने केलेल्या या सामन्यातील खेळीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अशात आता भारतीय संघाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकही डुसेनचे कौतुक केले आहे.
दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर डुसेनला संघात संधी दिली गेली. त्याने मिळालेल्या या संधीचे सोने केले. तो सध्या दक्षिण अफ्रिका संघाचा महत्वाचा क्रिकेटपटू बनला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने तुफान फटकेबाजी केली. त्याने या सामन्यात ६० चेंडूत ९४ धावा केल्या. यामध्ये त्याच्या पाच चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. दिनेश कार्तिक त्याचे हे प्रदर्शन पाहून चांगलाच प्रभावित झाला आहे. त्याने डुसेनचे तोंडभरून कौतुक केले आणि डुसेनला दक्षिण अफ्रिकेचे भविष्य सांगितले आहे.
कार्तिक क्रिकबजसोबत याविषयी चर्चा करत होता. तो यावेळी म्हणाला की, “या पूर्ण विश्वचषकात मला रासी वान डर डुसेनची सर्वात चांगली गोष्ट ही वाटली की, तो समजून घेतो, दबाव विलीन करून घेतो आणि परिस्थितीप्रमाणे खेळतो. उदाहरण द्यायचे झाल्यास, जेव्हा दक्षिण अफ्रिकेचा संघ वेस्ट इंडीजविरूद्ध छोट्या धावसंख्येचा पाठलाग करत होता, तेव्हा त्याने दबाव स्वत:कडे घेतला. त्याने थोडा वेळ घेतला आणि पुढे संघाला विजय मिळवून दिला. पाकिस्तानविरुद्ध सराव सामन्यातही त्याने शतक केले होते. ”
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा सलामीवीर रिजा हेंड्रिक्स अवघ्या दोन धावा करून बाद झाल होता. त्यानंतर डुसेनने डाव सांभाळला होता. याबाबत बोलताना कार्तिक म्हणाला की, “रीजा हेंड्रिक्स लवकर बाद झाला तर दबावाच्या स्थितीत डुसेन फलंदाजी करण्यासाठी आला. त्याने तिथून डाव सांभाळला आणि काही आकर्षक स्ट्रोक्स खेळले. तो लेग साइडला अप्रतीम शॉट खेळतो. दक्षिण अफ्रिकेच्या भविष्यासाठी रासी वान डर डुसेन चांगला फलंदाज आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
खत्म टाटा बाय बाय..! अफगाणिस्तानवर न्यूझीलंडचा विजय अन् टीम इंडियावरील मीम्सचा सोशल मीडियावर पूर
“आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले पण…” नबीने व्यक्त केली खंत