भारत आणि बांगलादेश या संघात रविवारी (दि. 4 डिसेंबर) ढाका येथे एकदिवसीय सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 186 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघाचीही चांगली दमछाक झाली. आणि बांगलादेश संघ 1 विकेटने विजय मिळवण्यात यशस्वी झाला. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी चांगलीच छाप टाकली. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने चांगल्या गोलंदाजीच प्रदर्शन केले. त्याच्या या प्रदर्शनामुळे भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक भलताच खुष आहे. तो म्हणाला की सिराज ज्या पद्धतीनेे गोलंदाजी करत आहे त्याकडे बघता तो एकदिवसीय विश्वचषकातील निवडीसाठी प्रबळ दावेदार आहे.
सिराजकडे विकेट घेण्याची क्षमता आहे- दिनेश कार्तिक
भारताकडून मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने भेदक गोलंदाजी करत सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. त्याच्या गोलंदाजीतील या प्रदर्शनाची चांगली प्रशंसा केली जात आहे. त्यातच दिनेश कार्तिक यानेही सिराजच्या गोलंदाजीची प्रशंसा केली. त्याच्या मते सिराज एकदिवसीय विश्वचषकात निवडीसठी प्रबळ दावेदार आहे. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, “सिराज नव्या चेंडूने उपयुक्त गोलंदाजी करतो आणि मधल्या षटकातही तो चांगले प्रदर्शन करतो. आपल्या सर्वांना माहितीये की भारताच्या गोलंदाजीत एका बाजूला जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah) तर दुसरी बाजू पूर्णपणे रिकामी आहे. माझ्यामते विश्वचषकासाठी सिराज प्रबळ दावेदार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तो मालिकावीर म्हणून निवडण्यात आला होता. तो नक्कीच विश्वचषकात निवडला जाऊ शकतो, कारण त्याच्याकडेे विकेट्स काढण्याची क्षमता आहे.”
बांगलादेश संघाने रविवारी भारताविरुद्ध खेळलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोमहर्षकरीत्या विजय मिळवला. बांगलादेश संघासाठी मेहदी हसन (Mehidy Hasan) आणि मुस्तफिजुर रेहमान (Mustafijur Rehman) यांनी दहाव्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. भारताने प्रथम फलंदाजी करत 41.2 षटकात 186 धावा केल्या. हे आव्हान बांगलादेश संघाने 9 गडी गमावत 46व्या षटकात गाठले.(Dinesh Karthik said that Mohammed Siraj is the strong contender for World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकदिवसीय संघात राहुल ‘या’ जबाबदारीसाठी होतोय तयार, बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर केला खुलासा
भारताला हरवल्यावर बांगलादेशच्या कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला,’आम्हाला वाटलं होत..’