भारताचा युवा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याचा शुक्रवारी (30 डिसेंबर,2022) मोठा कार अपघात झाला. दिल्ली-डेहराडून महामार्गावर झालेल्या या अपघातानंतर त्याला एका बस ड्रायव्हर आणि कंडक्टरने स्थानिक लोकांच्या मदतीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्यावर सध्या डेहराडूनच्या मॅक्स मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) अध्यक्ष श्याम शर्मा यांनी त्याची भेट घेतली. यानंतर त्यांनी ‘रिषभला भेटू नका’, अशी कळकळीची विनंती केली आहे. त्यांनी असे का म्हटले असेल याचे कारण समोर आले आहे.
दिल्ली क्रिकेट असोसिएशनचा एक चमू रिषभचे हालचाल विचारण्यासाठी हॉस्पिटमध्ये गेला होता. त्याची भेट घेतल्यानंतर शर्मा म्हणाले, “रिषभ स्थिर असून तो उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. त्याच्या तब्येतीत सुधारणा होत असली तरी त्याला इंफेक्शनचा धोका आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो त्याला सध्या भेटू नका. त्याच्याबाबतीत कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही, ज्यामुळे त्याची तब्येत खालावेल.”
पंतला दिल्लीला हलवण्यात येईल असे वृत्त समोर येत होते, मात्र त्याची काही आवश्यकता नाही, असेही शर्मा यांनी सांगितले. त्याच्या उपचाराबाबत बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) सतत पंतच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. त्याला कुठेही हलवले जाणार नसून शनिवारीच (31 डिसेंबर) बॉलिवूडचे अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनी त्याची भेट घेतली.
पंतला जानेवारी महिन्यात घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी20 आणि वनडे मालिकेसाठी विश्रांती दिली होती. यामुळे तो त्याच्या फिटनेसमध्ये सुधारणा करण्यासाठी बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत (एनसीए) जाणार होता. त्याआधी तो त्याच्या कुटुंबाची भेट घेणार होता. तेव्हा तो एकटा घरी जाण्यास निघाला तेव्हा हा अपघात झाला.
या अपघातात पंतच्या डोके, पाठी आणि पायाला जबर मार लागला आहे. त्याच्या मेंदू आणि पाठीच्या कण्याचे एमआरआय स्कॅन रिपोर्ट्स आले असून तो नॉर्मल आहे. मात्र त्याला किती दिवस क्रिकेटपासून दूर रहावे लागेल हे सांगणे कठीण आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सूरमा’ संदीप सिंग हरियाणाच्या क्रीडामंत्रीपदावरून पायउतार! महिला प्रशिक्षकाने लावले गंभीर आरोप
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आदेश! पगारात 40 टक्के कपात स्वीकारा, नाहीतर घरी…