आज दि.27 जूनपासून भारताची आयर्लंड विरुद्धची टी-20 मालिका सुरू होत आहे.
या मालिकेसाठी भारतीय संघातील सर्वच खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असल्यामुळे आजच्या सामन्यासाठी संघ निवडताना संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढणार आहे.
याच मुद्द्यावर भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने एका वृत्तवाहिनी वरील कार्यक्रमात भारतीय संघ व्यवस्थापनाला सल्ला दिला आहे.
2018 च्या आयपीएल स्पर्धेत अपयशी ठरलेल्या रोहित शर्माची सेहवागने पाठराखण केली.
सेहवागच्या मते आजच्या सामन्यासाठी रोहित शर्मा आणि शिखर धवन या नियमीत सलामीवीरांनीच डावाची सुरवात करावी.
तर आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या केएल राहुलला संघात समाविष्ट करून फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकावर बढती द्यावी.
राहुलने आयपीएलमध्ये 14 सामन्यात 659 धावा केल्या होत्या.
तसेच विराट कोहली चौथ्या तर धोनीने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आल्यास भारतीय संघाच्या फलंदाजीचा योग्य समतोल साधला जाईल.
धोनीने नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये पाचव्या क्रमांकावर येत 16 सामन्यात 455 धावा केल्या होत्या. धोनीच्या आयपीएल कारकिर्दितल्या एका सत्रातल्या या सर्वोच्च धावा आहेत.
2018 च्या आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी करुन संघात स्थान मिळवलेल्या दिनेश कार्तिकला मात्र संघात स्थान देऊ नये असे सेहवाग म्हणाला.
भारतीय संघ आज दि.27 जून आणि 29 जूनला आयर्लंड विरुद्ध दोन टी-20 सामने खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–भारताची अवस्था इंग्लंडसारखी करु, आयर्लंडच्या कर्णधाराचे…
-भारताची अवस्था इंग्लंडसारखी करु, आयर्लंडच्या कर्णधाराचे…