ईस्ट बंगाल एफसी इंडियन सुपर लीगच्या २०२२-२३ (आयएसएल) परतीच्या सामन्यात जमशेदपूर एफसीवर पुन्हा विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. शुक्रवारी (१३ जानेवारी)कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर ही लढत होणार आहे. हिरो आयएसएलच्या यंदाच्या पर्वातील पहिल्या टप्प्यात ईस्ट बंगालने ३-१ अशा फरकाने जमशेदपूर एफसीवर विजय मिळवला होता.
ईस्ट बंगालने घरच्या मैदानावर मागील लढतीत बंगळुरू एफसीवर २-१ असा विजय मिळवला, परंतु त्यानंतर ओडिशा एफसीकडून त्यांना ३-१ असा पराभव पत्करावा लागला. त्या सामन्यात ईस्ट बंगालने आघाडी घेतली होती, परंतु ओडिशाकडून जबरदस्त पलटवार झाला. क्लेईटन सिल्वाने मागील आठवड्यात यंदाच्या पर्वातील आठवा गोल केला आणि सर्वाधिक गोल करणाऱ्यांमध्ये तो अव्वल स्थानी जाऊन बसला. ब्राझीलियन स्ट्रायकरने सलग दोन सामन्यांत गोल केले आहेत आणि जमशेदपूर एफसीविरुद्ध हाच फॉर्म कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईन हे पुन्हा प्रमुख गोलरक्षक कमलजीत सिंग याच्याशिवाय सामन्याची सुरूवात करतील. सुहैर व्हीपी निलंबनाची शिक्षा पूर्ण करून उद्याच्या सामन्यात खेळणार असल्याने ईस्ट बंगालच्या आक्रमणाची धार तीव्र झाली आहे. ”या लीगमध्ये कोणताच सामना सोपा नाही. जमशेदपूरविरुद्ध आम्ही तीन गुण आधी मिळवले आहेत आणि आम्ही घरच्या मैदानावरील मागील सामनाही जिंकला आहे. त्यामुळे नव्या वर्षातील घरच्या मैदानावरील पहिला सामना जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. जमशेदपूरही आव्हान देण्यासाठी सज्ज असतील, याची मला खात्री आहे,”असे ते म्हणाले.
जमशेदपूर एफसीने मागील ९ सामन्यांत एक विजय मिळवला आहे आणि मागील आठवड्यात त्यांनी चेन्नईयन एफसीला २-२ असे बरोबरीत रोखले. संघातील प्रमुख स्ट्रायकर्सना गोल करण्यात अपयश आले आहे. विंगर रित्विक दासने मागील सामन्यात दोन गोल केले. मध्यरक्षक रफाएल क्रिव्हेलारोने पहिल्या गोलसाठी सहाय्य केले होते.
We are a little over 2️⃣4️⃣ hours away from our first 🏠 game this year!
Book your #EBFCJFC tickets if you haven’t yet 👉 https://t.co/7ILBG4XEBM#JoyEastBengal #HeroISL #আমাগোমশাল #EastBengalFC #IndianFootball #LetsFootball pic.twitter.com/JnOstxJKRu
— East Bengal FC (@eastbengal_fc) January 12, 2023
मुख्य प्रशिक्षक एडी बुथ्रॉयड यांन मध्यरक्षक प्रणॉय हलदरच्या पुनरागमन वर आनंद व्यक्त केला आहे. मागील वर्षी हलदरने जमशेदपूर एफसीविरुद्ध हिरो आयएसएलची शिल्ड उचलली होती. जमशेदपूरने डिलॅन फॉक्स यालाही करारबद्ध केले आहे, परंतु ऑस्ट्रेलियन बचावपटू उद्याच्या सामन्यात खेळणार नाही. ”फॉक्सला दुखापत झाली आहे आणि त्यामुळेच तो संघासोबत प्रवास करू शकलेला नाही, परंतु तो पुढील सामन्याआधी तंदुरुस्त होईल. प्रणॉय चांगला खेळाडू आहे आणि त्याने त्याच्या कामगिरीतून ते सिद्ध केले आहे. क्रिव्हेलारोसह हे तीन खेळाडू संघात आल्याने मजबूती मिळाली आहे. आता लीगचा ताठ मानेने निरोप घ्यायचा हा आमचा निर्धार आहे,”असे बुथ्रॉयड म्हणाले.
दोन्ही संघांमध्ये हिरो आयएसएलमध्ये पाच सामने झाले आहेत. ईस्ट बंगालने दोन विजय मिळवले आहेत, तर जमशेदपूरच्या वाट्याला एकच विजय आला आहे. दोन सामने ड्रॉ राहिले आहेत.
(East Bengal FC eye full points against Jamshedpur FC in red-hot playoffs tussle)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चेन्नईयनने जबरदस्त खेळ केला, पण हैदराबादने अखेरच्या क्षणी सामना बरोबरीत रोखला
INDvsSL | श्रीलंकन संघावर मोठी नामुष्की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नकोसा विक्रम भारताने टाळला