---Advertisement---

रोहितचा पहिल्याच षटकात ‘रॉकेट’ सिक्स, प्रत्येक क्रिकेटप्रेमीने पाहावा असा आहे हा षटकार!

On: शनिवार, जुलै 9, 2022 10:55 PM
Rohit-Six
---Advertisement---

शनिवारी (९ जुलै) इंग्लंड आणि भारत यांच्यातील टी-२० मालिकेचा दुसरा सामना खेळला गेला. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ५० धावांनी जिंकला होता. रोहित शर्माने या सामन्यात १४ चेंडूत १७१.४२ च्या स्ट्राईक रेटने २४ धावा केल्या होत्या. उभय संघातील दुसऱ्या सामन्यातही रोहितने २० चेंडूत १५५ च्या स्ट्राईक रेटने ३१ धावा केल्या आणि संघाला वेगवान सुरुवात दिली. दरम्यान डेविड विलीने टाकलेल्या पहिल्या षटकात रोहितने एक जोरदार षटकार मारला, ज्याची चांगलाची चर्चा होत आहे.

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकल्यानंतर या सामन्यात प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाज खेळपट्टीवर आल्यानंतर पहिल्याच षटकात इंग्लंडचा गोलंदाजी अष्टपैलू डेविड विली (David Willey) गोलंदाजी करण्यासाठी आला. षटकातील पहिल्या पाच चेंडूंवर विलीने दोन धावा खर्च केल्या. परंतु शेवटच्या चेंडूवर रोहित शर्मा (Rohit Sharma) स्ट्राईकवर होता आणि त्याने जोरदार षटकार ठोकला.

https://twitter.com/editor_Ishwar/status/1545763986431324160?s=20&t=tEktuJGiKxr1Re2qgSsh1A

यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) या सामन्यात रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी आला होता. पंतने १५ चेंडूत १७३.३३ च्या स्ट्राईक रेटने २६ धावा केल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी २९ चेंडूत ४९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर सहाव्या क्रमांकवर फलंदाजीसाठी आलेल्या अष्टपैलू रवींद्र जडेजाने २९ चेंडूत नाबाद ४६ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ ८ विकेट्सच्या नुकसानावर १७० धावा केल्या.

इंग्लंडसाठी रिचर्ड ग्लीसन (Richard Gleeson) याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात त्याने जबरदस्त प्रदर्शन केले. ग्लीसनने टाकलेल्या ४ षटकांमध्ये अवघ्या १५ धावा खर्च केल्या आणि तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. या तीन विकेट्स रोहित शर्मा, विराट कोहली (१), आणि रिषभ पंतचा समावेश होता. तसेच वेगवान गोलंदाज क्रिस जॉर्डननेही अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. जॉर्डनने ४ षटकांमध्ये २७ धावा खर्च करून सर्वाधिक ४ धावा केल्या होत्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

इंग्लंड संघाचे कसोटीही टी२० प्रमाणे खेळण्याचे गुपित उलगडले, खुद्द बेयरस्टोने सांगितलंय

अखेर मुहूर्त लागला! तब्बल ६ वर्षांनंतर भारतीय संघ जाणार ‘या’ देशाच्या दौऱ्यावर

रविंद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्जचं ‘ब्रेकअप’? फ्रँचायझीकडून मोठं विधान आलं पुढे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---