युरोपमध्ये चालू असलेल्या युरो चषक २०२० अंतिम टप्प्यात आला आहे. नुकताच बुधवारी (०७ जुलै) विम्बले येथे इंग्लंड आणि डेनमार्क यांच्यात युरो चषकाचा दुसरा उपांत्य फेरी सामना पार पडला. हॅरी केनच्या शानदार गोलमुळे इंग्लंड संघाने डेनमार्कला २-१ ने पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. यासह तब्बल ५५ वर्षांच्या नकोशा मालिकेला इंग्लंडने खंडित केले आहे. यापुर्वी कोणत्याही मोठ्या फुलबॉल टूर्नामेंटच्या अंतिम सामन्यापर्यंत त्यांना मजल मारता आली नव्हती.
हॅरी केनने इंजुरी टाइममध्ये (१०४ वा मिनिट) शानदार गोल करत आपल्या इंग्लंड संघाला युरो चषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचवले. १९६६ नंतर पहिल्यांदाच इंग्लंडने कोणत्या मोठ्या फुटबॉल टूर्नामेंटच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. तत्पुर्वी त्यांना वर्ल्ड कप किंवा युरोपीय चँपियनशीपमध्ये ४ वेळा अंतिम सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. यात १९९०, १९९६ आणि २०१८ मध्ये त्यांचा पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव झाला आहे.
आता युरो चषक २०२० च्या अंतिम सामन्यात रविवारी (११ जुलै) त्यांचा प्रतिस्पर्धी इटली संघ असेल.
One piece of history achieved, but another huge one still to be made.
Tonight, though, we celebrate! 🙌 pic.twitter.com/cwX2ou63m9
— England (@England) July 7, 2021
दरम्यान दुसऱ्या उपांत्य फेरी सामन्यात इंग्लंडचा प्रतिस्पर्धी डेनमार्कने शानदार सुरुवात केली होती. ३० व्या मिनिटाला डेनमार्कच्या मिकेल डेम्सगार्डच्या गोलच्या बळावर त्यांनी १-० अशी आघाडी घेतली होती. परंतु इंग्लंडनेही अप्रतिम गोल करत सामना बरोबरीवर आणला. सिमोन जाइलने ३९ व्या मिनिटाला आत्मघाती गोल करत दुसऱ्या हाफमध्ये निर्धारित वेळेपर्यंत इंग्लंड संघाला १-१ ने बरोबरीवर पोहोचवले.
They've made it into the EURO final for the first time. 🙌
They've come so far 👏 🏴#ThreeLions https://t.co/ntmjBVoC6D
— England Football (@EnglandFootball) July 7, 2021
अशात इंजुरी टाइमवेळी डेनमार्कच्या जेंसनला रेड कार्ड दाखवण्यात आला आणि त्याला सामन्यातून पडावे लागले. इंग्लंडने या संधीचा लाभ घेत १०४ व्या मिनिटाला गोल करत २-१ असा विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
आधी ड्रॉ मग पेनल्टी शूटआउट; रोमांचक लढतीत स्पेनला पराभूत करत इटलीची अंतिम सामन्यात धडक
हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने ‘या’ खेळाडूने प्रेयसीला केले प्रपोज, व्हिडिओ होतोय व्हायरल
विजयाचा उन्माद! उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर खेळाडूंनी भर मैदानात काढल्या पॅन्ट