अमेरिकेत नव्याने सुरू होत असलेल्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धेतील संघ आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना करारबद्ध करत आहेत. अमेरिकेत क्रिकेटचा प्रचार होण्यासाठी ही नवीन लीग जूलै महिन्यात सुरू होईल. या लीगमध्ये इंडिया सिमेंट तथा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्स यांच्या मालकीचा टेक्सास सुपर किंग्स हा संघ सहभागी होत आहे. या संघाच्या कर्णधाराची नुकतीच घोषणा करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस स्पर्धेच्या हंगामात संघाचे नेतृत्व करेल.
दोन दिवसांपूर्वीच टेक्सास सुपर किंग्स संघाकडून 7 आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या नावाची घोषणा केली गेली. यामध्ये ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायुडू, डेवॉन कॉनवे, मिचेल सॅंटनर, डॅनियल सॅम्स, डेव्हिड मिलर व गेराल्ड कोएत्झे यांचा समावेश आहे. यानंतर आठवा विदेशी खेळाडू म्हणून प्लेसिस याच्या नावाची घोषणा केली गेली. यासोबतच तो संघाचे नेतृत्व करेल हे देखील जाहीर करण्यात आले. टेक्सास संघ आणखी एक विदेशी खेळाडू आपल्या संघात निवडू शकतो.
https://www.instagram.com/reel/CtjYZVPhQ8m/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
प्लेसिस हा सीएसकेच्या मालकीच्या जोहान्सबर्ग सुपर किंग्स या संघाचा देखील कर्णधार आहे. हा संघ दक्षिण आफ्रिकेतील एसए टी20 लीगमध्ये खेळताना दिसतो. स्पर्धेच्या पहिल्या हंगामात या संघाला फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती.
चेन्नई व जो’बर्ग प्रमाणेच या संघाचा मुख्य प्रशिक्षक देखील स्टीफन फ्लेमिंग हा असेल. गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका एरिक सिमन्स तर, सहाय्यक प्रशिक्षक म्हणून एल्बी मॉर्केल हे जबाबदारी सांभाळतील. स्पर्धेला 13 जुलैपासून सुरुवात होईल. तर, अंतिम सामना 30 जूलै रोजी खेळण्यात येईल.
(Faf Du Plessis Become Captain Of Texas Super Kings In Major League Cricket MLC 2023)
महत्वाच्या बातम्या –
WTC ट्रॉफी गमावल्यानंतर लंडनमध्ये पत्नी अनुष्कासह भजन ऐकायला गेला विराट, फोटोही जोरदार व्हायरल
बांगलादेशने उद्ध्वस्त केले कसोटी क्रिकेटचे रेकॉर्ड, अफगाणिस्तावर मिळवला 500हून अधिक धावांनी दणदणीत विजय