दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस आता आयपीएमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळल्यानंतर लगेचच दुसऱ्या टी२० लीगमध्ये खेळताना दिसून येणार आहे. आयपीएल २०२० मधील चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले असल्याने आता तो दुसऱ्या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो.
डू प्लेसिस आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर जाल्मी संघाकडून प्लेऑफच्या फेरीत खेळताना दिसणार आहे. जर त्याला या संघाकडून अंतिम ११ जणांच्या संघात खेळण्याची संधी मिळाली तर तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये पदार्पण करेल.
पाकिस्तान सुपर लीगचे प्लेऑफ सामने मार्चमध्ये सुरु होणार होते, परंतु त्यावेळी कोरोना व्हायरसच्या संकटामुळे हे सामने स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर आता ही उर्वरित स्पर्धा १४ नोव्हेंबरनंतर पुन्हा सुरु होणार आहे.
फाफ डू प्लेसिसला कायरन पोलार्डच्या ऐवजी पेशावर संघात स्थान मिळाले आहे. पोलार्ड आयपीएलनंतर वेस्ट इंडिज संघासह न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.
या संघातही सामील झाले बदली खेळाडू –
कराची किंग्स संघात ख्रिस जॉर्डनच्या ऐवजी शेर्फेन रुदरफोर्ड संघात सामील झाला आहे, तर दुखापतग्रस्त वकास मकसूदच्या ऐवजी अमेरिकेचा अली खान या संघाशी जोडला गेला आहे. लाहोर कलंदर्स संघात तमीम इक्बालला ख्रिस लीनच्या ऐवजी, आबिद अलीला सलमान बटच्या ऐवजी, तर आगा सलमानला सेक्कुगे प्रसन्नाच्या ऐवजी जागा मिळाली आहे. तसेच मुल्तान सुलतानमध्ये मोईन अलीची जागा महमुदुल्लाहने घेतली आहे. अॅडम लाइटला फॅबियन ऍलन ऐवजी संघात स्थान मिळाले आहे.
१४ नोव्हेंबरला मुल्तान सुलतान विरुद्ध कराची किंग्स संघात क्वालिफायरचा सामना होणार आहे.. त्यानंतर लाहोर कलंदर्स विरुद्ध पेशावर जाल्मी संघात एलिमिनेटरचा सामना होईल. दुसरा एलिमिनेटरचा सामना १५ नोव्हेंबरला होणार आहे. तर १७ नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
इतिहासाची होणार पुनरावृत्ती? प्लेऑफच्या शर्यतीत असूनही कोलकाताला सतावतेय ‘या’ गोष्टीची भीती
विराटच्या RCB विरुद्ध विजय मिळवण्याचे श्रेय अय्यरने दिले ‘या’ खेळाडूंना
‘करो या मरो’च्या लढाईत हैदराबाद करणार मुंबईशी दोन हात; पाहा दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन
ट्रेंडिंग लेख –
IPL – धोनी पुढील हंगाम खेळणार, परंतु ‘हे’ खेळाडू होऊ शकतात चेन्नई संघातून बाहेर
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?