कोरोना व्हायरसचा फटका बसलेल्या अनेक क्षेत्रांपैकी क्रीडाक्षेत्र देखील आहे. मागील काही महिन्यांपासून अनेक महत्त्वाच्या स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. पण आता हळूहळू का होईना पण क्रीडा क्षेत्र पुन्हा सुरु होण्याच्या दिशेने पाऊले उचलण्यास सुरुवात झाली आहे. पण असे असले तरी नजीकच्या भविष्यात काही काळासाठी प्रेक्षकांविनाच क्रीडा स्पर्धा होण्याचीच शक्यता दाट आहे.
याबद्दल भारताच्या वनडे आणि टी२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे की जगभरातील कोणत्याही क्रीडा स्पर्धेसाठी चाहते खूप महत्वाचे आहेत.
ला लीगाच्या फेसबुक पेजवर बोलताना रोहित म्हणाला, ‘जगभरातील कोणत्याही स्पर्धेसाठी चाहते खूप महत्वाचे आहेत. त्यांच्यामुळे कोणताही खेळ मोहक (glamorous) दिसतो. काही काळासाठी तरी त्यांच्या तिथे नसल्याने आता आपल्याला त्यांचे महत्त्व कळेल.’
भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित पुढे म्हणाला, ‘या क्षणी तरी लोकांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. एकदा ते उपाय केले गेले की त्यानंतर चाहत्यांना स्टेडियमवर येऊन खेळ पाहण्याची परवानगी मिळू शकेल. सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे आणि कोणतेही उपाययोजना करण्यापूर्वी ही गोष्ट विचारात घेतले जाईल.’
नुकतेच केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी स्पष्ट केले आहे की सध्याच्या कोरोना व्हायरसच्या परिस्थितीत रिकाम्या स्टेडियममध्ये क्रीडा सामने खेळवण्यासाठी देशाने सज्ज असायला हवे.
रोहित सध्या मुंबईत कुंटुंबासमवेत आहे. त्याने त्याचा शेवटचा सामना फेब्रुवारीमध्ये खेळला आहे. त्यानंतर तो पोटरीच्या दुखापतीमुळे काहीदिवस क्रिकेटपासून दूर होता. पण तंदुरुस्त झाल्यानंतर लॉकडाऊन सुरु झाल्याने त्याला सध्या घरातच थांबावे लागले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
प्रेक्षकांविना सामने खेळवण्याबद्दल बीसीसीआयचे मोठे भाष्य
डीडीएलजेचा ट्रेनवाला फेमस किस्सा, तोही या भारतीय खेळाडूबरोबर
रोहित शर्माला लॉकडाऊनदरम्यान या गोष्टीची येतेय सर्वात जास्त आठवण