भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. असंख्य लोक आपले प्राण गमावत आहे. अशातच ओडिशा क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, दिवंगत शिल्पकार आणि राज्यसभेचे खासदार रघुनाथ मोहपात्रा यांचे पुत्र प्रशांत मोहपात्रा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. एम्सचे अधीक्षक सच्चिदानंद मोहंती यांनी ही माहिती दिली.
प्रशांतला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्याला व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांचे एक विशेष पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन होते. यापूर्वी ९ मे रोजी त्याच्या वडिलांचे ही कोरोनामुळे निधन झाले होते.
प्रशांत मोहपात्राच्या निधनाची माहिती मिळताच, भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगने ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. त्याने लिहिले की, “प्रशांत मोहपात्रा यांचे निधन झाले आहे. तो बरीच वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला आणि तो मॅच रेफरी होता. तो खूप लवकर सोडून गेला आहे. कुटुंब आणि मित्रांबद्दल सहानुभूती.. तो एक महान आत्मा होता.. प्रशांतच्या आत्म्याला शांती लाभो. ओम शांती.”
Prashant Mohapatra passed away.. He played many year first class cricket and was a match referee for @BCCIdomestic cricket .. Gone to soon.. condolences to family and friends.. He was a great soul.. RIP brother Prashant 🙏🙏 OM Shanti pic.twitter.com/uG7SCcK218
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) May 19, 2021
प्रशांतने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ओडीशा संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याने १९९० मध्ये बिहार संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पदार्पण केले होते. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण ४५ सामने खेळले होते. यात त्याला २१९६ धावा करण्यात यश आले होते. तर नाबाद १५७ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. तसेच १७ लिस्ट ए सामन्यात त्याने २६१ धावा केल्या होत्या. यात नाबाद ४९ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. तसेच त्याने देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट सामन्यांमध्ये रेफरी ची भूमिका बजावली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
पुढील ३ जन्म सौरव गांगुलीला करायचंय हेच काम, स्वत: पोस्ट करत दिली माहिती
डेटवर येणार का? चाहत्याने विचारलेल्या या प्रश्नाला मयंती लँगरने दिले होते भन्नाट उत्तर
कुलदीपने गेस्ट हाऊसमध्ये घेतला कोरोना लसीचा पहिला डोस? कानपूर प्रशानसाने दिले चौकशीचे आदेश