आंतरराष्ट्रीय क्रिकेटला शनिवारी राम राम ठोकणाऱ्या एमएस धोनीने आपल्या कारकिर्दीत अनेक यशांना गवसणी घातली आहे. त्याने भारतीय संघाला आयसीसीच्या ३ ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. धोनीने यष्टीरक्षक, अप्रतिम फलंदाज आणि चपळ कर्णधार अशा विविध भूमिका उत्तमरीत्या पार पाडल्या आहेत.
धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर अनेक दिग्गजांनी आपापली मते मांडली आहेत. यामध्ये आता माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरचाही समावेश झाला आहे. धोनीबद्दल बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, जागतिक क्रिकेटमधील सर्व विक्रम मोडले जातील, परंतु धोनीचा खास विक्रम कधीच मोडला जाणार नाही.
गंभीरने धोनीच्या विक्रमांना सांगितले खास
गंभीरने धोनीच्या त्या खास विक्रमांबद्दल बोलताना म्हटले की, “जर तुम्ही एखाद्या विक्रमाबद्दल चर्चा करणार असाल, जो नेहमीसाठी कायम राहणार आहे, तर तो आहे धोनीचा आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकण्याचा. मला नाही वाटत की दुसरा कोणताही कर्णधार हा विक्रम मोडू शकेल.”
“मग तो आंतरराष्ट्रीय टी२० विश्वचषक असो किंवा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी असो किंवा वनडे विश्वचषक, कोणताही कर्णधार या ट्रॉफी जिंकू शकणार नाही,” असेही तो पुढे म्हणाला.
सचिन- रोहितचा विक्रम मोडता येईल
गंभीरने स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात म्हटले की, “मला वाटते की हा असा विक्रम आहे जो नेहमीसाठी राहणार आहे. त्याचबरोबर मी पैज लावू शकतो की हा नेहमीसाठी राहील. मला वाटते की, शतकांचा विक्रम कधी ना कधी मोडला जाईल. कोणीतरी येईल आणि रोहित शर्माच्या तुलनेत कदाचित अधिक द्विशतके ठोकेल. परंतु मला नाही वाटत की धोनीचा ३ ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम मोडू शकेल. त्यामुळे धोनीचा हा विक्रम नेहमीसाठी राहणार आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
-धोनीच्या निवृत्तीनंतर या दोन भारतीय खेळाडूंना आता येणार सुखाची झोप
-हार्दिक पंड्याच्या २० दिवसांच्या मुलाला ‘या’ कंपनीने भेट दिली कार
-अनिल कुंबळेकडून गुरुमंत्र घेऊन केएल राहुलने सुरू केली आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची तयारी
ट्रेंडिंग लेख-
-‘या’ ३ बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं सुरेश रैनाचे अफेयर, अनुष्कासोबतही होती चर्चा
-वडिलांचा अंत्यविधी पार पडल्यानंतर अचानक सकाळी सकाळी विराट पुन्हा संघात दाखल झाला