भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग हा सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत अनेकदा भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून तो भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे. परंतु, तो आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येत असतो. नुकताच त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभवाच्या जोरावर कसोटी क्रिकेटचा सर्वकालिक अकरा खेळाडूंचा संघ निवडला आहे.
हरभजन सिंगने माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागला निडर होऊन क्रिकेट खेळण्याचे ब्रँड ॲम्बेसेडर, असे म्हटले आहे. तसेच त्याला मॉर्डन डे क्रिकेटचा विवियन रिचर्ड्स देखील म्हटले आहे. हरभजन सिंगने आपल्या सर्वकालिक प्लेइंग ईलेव्हेनमध्ये डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी ऍलिस्टर कुक आणि वीरेंद्र सेहवागला दिली आहे. तर तिसऱ्या क्रमांकासाठी ब्रायन लारा आणि चौथ्या क्रमांकासाठी सचिन तेंडुलकरची निवड केली आहे.
हरभजन सिंगने स्पोर्ट्सकिडासोबत चर्चा करताना या प्लेइंग ईलेव्हेनची घोषणा केली आहे. या संघाचे कर्णधारपद त्याने माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह वॉच्या हाती दिले आहे. तसेच त्याला या संघात ५ वे स्थान दिले आहे . तसेच सहाव्या क्रमांकावर हरभजन सिंगने दिग्गज अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसला स्थान दिले आहे.
तसेच हरभजन सिंगने यष्टिरक्षक फलंदाज म्हणून एमएस धोनी नव्हे, तर कुमार संगकाराची निवड केली आहे. त्याला या संघात ७ वे स्थान दिले आहे. तसेच ८ व्या क्रमांकावर गोलंदाज म्हणून त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नला संधी दिली आहे.तर ९ व्या क्रमांकावर डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज वसीम अक्रमला संधी दिली आहे.
तसेच १० व्या आणि ११ व्या क्रमांकाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १० व्या क्रमांकावर ग्लेन मॅकग्राला संधी दिली आहे. तसेच ११ व्या स्थानी त्याने जेम्स अँडरसन आहे. यासह त्याने १२ व्या स्थानी दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनला संधी दिली आहे. जो शेन वॉर्न ऐवजी गोलंदाजी करू शकेल.
अशी आहे हरभजन सिंगने निवडलेली कसोटी क्रिकेटमधील सर्वकालिक प्लेइंग ईलेव्हेन : ॲलिस्टर कुक, वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर, स्टीव्ह वॉ (कर्णधार), जॅक कॅलिस, कुमार संगकारा (यष्टिरक्षक), शेन वॉर्न, वसीम अक्रम, ग्लेन मॅकग्रा, जेम्स अँडरसन, मुथय्या मुरलीधरन (१२ वा खेळाडू)
महत्त्वाच्या बातम्या –
पुजारा-रहाणे नव्हे, तर ‘हा’ फलंदाज मुंबई कसोटीतून होऊ शकतो बाहेर; पाहा संभावित ‘प्लेइंग इलेव्हन’
आयपीएलमधील ३ दिग्गज ज्यांच्यावर आता बोली लागणं कठीण, कारकीर्द जवळपास संपुष्टात
आर्चर, स्टोक्स राजस्थान रॉयल्समधून मुक्त! संगकाराकडून निर्णायामागचे खरे कारण उघड