भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोव्हिक या दोघांची जोडी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. तसेच हे दोघही सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव असतात.आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधण्यासाठी ते नेहमीच काही-ना-काही पोस्ट शेअर करत असतात. अशातच नताशा स्टेनकोव्हिकने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यावर, आयपीएल खेळण्यात व्यस्त असलेल्या हार्दिक पंड्याने आपले प्रेम जाहीर करत प्रतिक्रीया दिली आहे.
हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएल खेळण्यात व्यस्त असला तरीदेखील तो आपल्या पत्नीवर प्रेम जाहीर करण्याची कुठलीच संधी गमावत नाहीये. नताशा स्टेनकोव्हिकने नुकतीच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामधे तिने पांढऱ्या रंगाचा जीन्स आणि टॉप घातल्याचे दिसून येत आहे.
https://www.instagram.com/p/COHqTXKgyFq/?igshid=1oh7d3jq6fr2e
या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसून येत आहे. या घायाळ करणाऱ्या फोटोवर हार्दिक पंड्याने हार्टवाला ईमोजी शेअर करत आपले प्रेम व्यक्त केले आहे. तसेच चार लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे.
यापूर्वीही डान्सचा व्हिडिओ झाला होता व्हायरल
यापूर्वी देखील नताशा स्टेनकोव्हिकने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक डान्स करत असतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध अमेरिकन रॅपर ‘कार्डी बी’च्या रॅप साँगवर नताशा जबरदस्त डान्स करताना दिसून आली होती.
हार्दिक पंड्याची निराशाजनक कामगिरी
मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या हार्दिक पंड्याला आयपीएल २०२१ मध्ये साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्याने आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. यात त्याला अवघ्या ३६ धावा करण्यात यश आले आहे. यामध्ये १५ धावा ही त्याची सर्वाधिक खेळी होती. तसेच दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तो ० धावा करत माघारी परतला होता. मुंबई इंडियन्स संघाचा पुढील सामना, गुरुवारी (२९ एप्रिल) राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात हार्दिक पंड्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यापूर्वी का करण्यात आला दिनेश कार्तिकचा सन्मान? ‘हे’ आहे कारण
मन जिंकलस भावा! सामना झाल्यानंतर केकेआरच्या कर्णधाराचे हृद्यास भिडणारे भाष्य, एकदा वाचाच