भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला अगस्त्य पंड्या नावाचा गोंडस मुलगा आहे. सोशल मीडियावर सिनीयर पंड्या व ज्युनियर पंड्या जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. हार्दिकने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांच्या जबरदस्त लाईक्स येतात. गेल्यावर्षी ३० जुलै रोजी अगस्त्यचा जन्म झाला होता. तेव्हा खुद्द हार्दिकने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती चाहत्यांना दिली होती. अगस्त्य आता नऊ महिन्यांचा झाला असून त्याने आता पाऊल टाकायला सुरुवात केली आहे.
अगस्त्यने सध्या चालायला सुरुवात केली असून, बाप हार्दिक यात त्याची मदत करत आहे. हार्दिकने ज्युनियर पंड्यासोबतचा आपला हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हार्दिक या फोटोमध्ये काळ्या रंगाचा टी-शर्ट व लाल रंगाच्या शॉर्टमध्ये दिसत आहे. त्याच्यासोबत ज्युनियर पंड्या हार्दिकचा हात पकडून चालताना दिसत आहे. हार्दिकने या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘हे बेबी’ हे गाणे लावले आहे.
https://www.instagram.com/p/CO72XP1FsVT/
विशेष म्हणजे या व्हिडीओवर माजी कर्णधार एमएस धोनीची पत्नी साक्षी सिंग व आजी कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मानेही कमेंट केली आहे. विराट व धोनी हे हार्दिकचे जवळचे मित्र मानले जातात. अनुष्काने या व्हिडीओवर पर्पल रंगाच्या तीन लव्ह इमोजीस टाकल्या आहेत. तर साक्षी धोनीने लव्ह इमीजी टाकली आहे.
या दोघींशिवाय कुलदीप यादव, सुनिल शेट्टी, केएल राहुलसह मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडियावरुनही कमेंट्स करण्यात आल्या आहेत.
हार्दिकच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर तो भारताकडून ११ कसोटी, ६० वनडे व ४८ टी२० सामने खेळला आहे. पाठीमागील काही काळ तो दुखापतीमुळे संघाबाहेर होता. मार्च महिन्यात तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला असून त्याने १ मे रोजी आयपीएलचा शेवटचा सामना खेळला आहे. इंग्लंडमध्ये होत असलेल्या वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी मात्र हार्दिकची भारतीय संघात निवड झालेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
पुढील ३ जन्म सौरव गांगुलीला करायचंय हेच काम, स्वत: पोस्ट करत दिली माहिती
डेटवर येणार का? चाहत्याने विचारलेल्या या प्रश्नाला मयंती लँगरने दिले होते भन्नाट उत्तर