आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणारे अनेकजण असतील, पण रोहित शर्मा याने जी कामगिरी केलीये, ती कुठल्याच खेळाडूला जमली नाहीये. रोहित एकापेक्षा जास्त विश्वचषकातील साखळी फेरीत सर्वाधिक चौकार मारणारा एकमेव फलंदाज बनला आहे. चला तर, त्याच्या या अद्वितीय कामगिरीविषयी जाणून घेऊयात…
रोहितचा विक्रम
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कर्णधार म्हणून असो किंवा खेळाडू म्हणून रोहित सर्वत्र चमकदार कामगिरी करत आहे. रोहितने या स्पर्धेत 9 सामने खेळताना तब्बल 58 चौकार मारले आहेत. या विश्वचषकातील साखळी फेरी संपल्यानंतर सर्वाधिक चौकार मारण्याच्या बाबतीत रोहित अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे.
विशेष म्हणजे, एकापेक्षा जास्त विश्वचषकातील साखळी फेरीत 50 हून अधिक चौकार मारणारा रोहित एकमेव फलंदाज आहे. रोहितने विश्वचषक 2023 स्पर्धेत 58 चौकार मारले आहेत. तसेच, यापूर्वी 2019च्या विश्वचषकात त्याच्या बॅटमधून 67 चौकारांची बरसात झाली होती.
Rohit Sharma is the only batsman with 50+ fours in league stage of multiple World Cup editions.
– 67 fours in 2019
– 58 fours in 2023— The Cricket Panda (@TheCricketPanda) November 14, 2023
रोहित शर्माची कामगिरी
रोहित शर्मा हा या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली (Virat Kohli) याच्यानंतर भारताचा दुसरा फलंदाज आहे. विराटच्या नावे 9 सामन्यात 594 धावा आहेत. तसेच, रोहितने 9 सामन्यात 55.89च्या सरासरीने 503 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, या धावा करताना रोहितने 1 शतक आणि 3 अर्धशतकांचाही पाऊस पाडला आहे. 131 ही रोहितची स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे.
संघाचे प्रदर्शन
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेत सर्वात यशस्वी संघ म्हणून पुढे आला आहे. भारताने साखळी फेरीत खेळलेल्या नऊच्या नऊ सामन्यात विजय मिळवला आहे. विशे म्हणजे, भारताने इंग्लंडविरुद्धचा सहावा सामना 100 धावांनी जिंकला होता. तसेच, सातव्या सामन्यात श्रीलंकेला 302 धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर आठव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी आणि अखेरच्या सामन्यात नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला होता. या सर्व सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवला होता. विशेष म्हणजे, भारत विश्वचषक उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा अव्वल संघ बनलेला. (hitman Rohit Sharma is the only batsman with 50+ fours in league stage of multiple World Cup editions)
हेही वाचा-
IND vs NZ सेमीफायनलपूर्वी आली विलियम्सनची प्रतिक्रिया; म्हणतो, ‘ही तर फक्त एक दिवसाची…’
‘मान्य करावंच लागेल, सेमीफायनलमध्ये दबाव…’, कोच द्रविडचे न्यूझीलंडशी भिडण्यापूर्वी मोठे विधान