पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने आज (८ जून) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाविषयी मोठा खुलासा केला आहे.
तो म्हणाला, “पीसीबी (PCB) आणि पाकिस्तानच्या कर्णधाराने मला २००५ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मी अनफीट असल्यामुळे नाही, तर माझ्यावर बलात्काराचा आरोप लावून मला संघातून वगळले होते. आतापर्यंत त्यांनी ते आरोप मागेही घेतलेले नाहीत.”
हॅलोच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त लाईव्ह सेशनमध्ये बोलत होता.
“पाकिस्तान संघातील (Pakistan Cricket Team) खेळाडूंच्या एका चुकीमुळे हे खोटे आरोप माझ्यावर करण्यात आले होते. तसेच मला संघातून वगळले. मी हा प्रसंग कोणत्याही माध्यमांमध्ये प्रसिद्ध केला नाही. परंतु आज मी हा प्रसंग हॅलोच्या माध्यमातून सांगत आहे,” असेही तो पुढे म्हणाला.
“पीसीबी आणि संघातील खेळाडू अनेकदा माझ्या माध्यमातील प्रसिद्धीमुळे मला त्रास देण्याचा प्रयत्न करायचे. परंतु मला मिळालेली प्रसिद्धी आणि यश हे माझ्या मेहनतीचे फळ आहे. मला त्रास देणारे ते खेळाडू आज केवळ नावापुरते आहेत. मला आजही संपूर्ण क्रिकेट जगतात ओळखले जाते. तसेच भारतात मला कधीच द्वेशाला सामोरे जावे लागले नाही. भारतात मला नेहमी प्रेम मिळाले आहे,” असे आपल्या प्रसिद्धीबद्दल बोलताना अख्तर म्हणाला.
अख्तरने भारतीय संघाचे माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) नेतृत्वाची प्रशंसाही केली. तो म्हणाला, धोनीने भारतीय संघाला एक नाव मिळवून दिले, तर गांगुलीने भारतीय संघाचा पाया रचला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-धोनीची ट्रॅक्टर खरेदी पाहुन आनंद महिंद्रा म्हणातात, मला पहिल्यापासूनच माहित होतं…
-सचिनला शंभरावे शतक करण्यापासून रोखल्याने ‘या’ खेळाडूला मिळाली होती जीवे मारण्याची धमकी
-युवराज सिंगने गौतम गंभीरला केले असे काही ट्रोल की…