भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज हर्षल पटेल आणि दीपक चाहर दुखापतीमुळे अनेक दिवस बाहेर होते. नुकतेच ते संघात परतले. जसप्रीत बुमराह हा देखील पूर्णपणे ठिक झाला नाही. त्याचबरोबर प्रसिध कृष्णा आणि यश दयाल हे दोघे पण दुखापतग्रस्त आहेत. यामुळे अनेक प्रश्ने निर्माण होत आहेत. त्यामधील महत्वाचा प्रश्न तो म्हणजे वेगवान गोलंदाजांच्या फिटनेसबाबत योग्य मार्गदर्शन मिळत आहे की नाही? हे प्रश्न भारताच्या दिग्गजाने उपस्थित केले आहेत.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)हा भारताच्या वेगवान गोलंदाजी ताफ्यातील महत्वाचा खेळाडू. त्याच्या अनुपस्थितीमुळे भारताला ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तो अजूनही पूर्णपणे फिट नाही. तसेच अनेक वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त आहेत, यामुळे माजी क्रिकेटपटू सबा करिम यांनी राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीवर (एनसीए) प्रश्न उठवले आहेत.
सबा करिम (Saba Karim) म्हणाले, “आशिया कप आणि टी20 विश्वचषक समोर होता, अशात बुमराह दुखापतग्रस्त होता. दीपक चाहर, हर्षल पटेल, प्रसिध कृष्णा आणि यश दयाल यांच्यासोबत अनेक नावे त्या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत होती. न्यूझीलंड दौऱ्यातही शार्दुल ठाकुर पुर्णपणे फिट दिसत नाही.”
“संघासाठी 10-12 वेगवान गोलंदाजांना निवडण्याची जबाबदारी संघ व्यवस्थापक आणि निवड अधिकाऱ्यांवर असते. हे काम राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीच्या अधिकाऱ्यांसोबत केले जाते. अशामध्ये खेळाडू वारंवार दुखापतीमुळे बाहेर राहिले तर एनसीएने योग्य ते मार्गदर्शन करण्याची गरज आहे. त्यांच्या फिटनेसवर लक्ष ठेवण्याचीही आवश्यकता आहे,” असेही करिम यांनी पुढे म्हटले.
नुकतेच भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यानेही भारताची मोठी अडचण वेगवाग गोलंदाजी आहे, असे म्हटले होते. तो पुढे म्हणाला, “शार्दुल न्यूझीलंडविरुद्ध दुसरा वनडे सामना का नाही खेळला? असे वाटत आहे नव्या खेळाडूंच्या शोधात जुन्यांना विसरत चालले आहेत. असे नको व्हायला हीऱ्याच्या शोधात सोने गमावून बसू.”
कैफने भुवनेश्वर कुमार याला वनडे संघात का घेत नाही, हा पण प्रश्न उपस्थित केला होता. तसेच त्याने एक सल्लाही दिला की, वनडे विश्वचषक जवळ येत असून संघ कायम ठेवा आणि वेगवेगळे प्रयोग करू नका. आतापासूनच कोणते गोलंदाज घ्यायचे हे ठरवा. In the NCA, laxity regarding the fitness of fast bowlers raised many questions
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जस्टिन लँगरच्या ‘भित्रा’ या वक्तव्याला पॅट कमिन्सचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाला, ‘ऑस्ट्रेलिया संघात…’
टीम इंडियाचा ‘फ्युचर प्लॅन’ आला समोर; पुढच्या एका वर्षात होणार हे बदल