भारत आणि ऑस्ट्रेलिया १७ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या यांच्यातील ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला खूप मोठा दिलासा मिळाला आहे. अनुभवी फलंदाज रोहित शर्मा सोमवारी (१४ डिसेंबर) ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराटच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघासाठी ही आनंदाची बातमी आहे.
शुक्रवारी पास केली होती फिटनेस टेस्ट
आयपीएलमध्ये झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेतून बाहेर झाला होता. सुरुवातीला कसोटी संघात त्याला स्थान मिळाले नव्हते. मात्र, काही दिवसांनी त्याचे नाव संघात समाविष्ट करण्यात आले होते. रोहित शर्मा भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना न होता बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे आपल्या फिटनेसवर काम करत होता. रोहितने शुक्रवारी (११ डिसेंबर) फिटनेस टेस्ट पूर्ण केली होती व त्याचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
मांसपेशीमध्ये निर्माण झाली होती समस्या
आयपीएल स्पर्धेदम्यान रोहितच्या मांसपेशीमध्ये समस्या निर्माण झाली होती. काही सामन्यांत आराम घेतल्यानंतर रोहितने आयपीएलमधील उर्वरित सर्व सामने खेळले व अंतिम सामन्यात उत्तम कामगिरी करत मुंबई इंडियन्स संघाला आपले पाचवे विजेतेपद मिळवून दिले होते. तरीदेखील रोहितला भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे सर्व क्रिकेट रसिकांना आश्चर्य झाले होते.
बीसीसीआयने या बाबतीत स्पष्ट केले होते की, रोहितने प्रथम आपली फिटनेस सिद्ध करणे गरजेचे आहे. त्यामुळे रोहितने शुक्रवारी आपली फिटनेस टेस्ट पूर्ण केली व तो आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी रवाना होणार आहे.
रोहित जरी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होत असला, तरी तो तेथे १४ दिवस क्वारंटाईन असेल. त्यामुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यात तो खेळू शकणार नाही. क्वारंटाईन संपल्यानंतर त्याच्या फिटनेस बाबत पुन्हा टेस्ट केली जाईल व त्यानंतर त्याच्या उर्वरित मालिकेतील समावेशाबद्दल निर्णय घेतला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता! आजच्या दिवशी झाला होता कसोटी क्रिकेट इतिहासातील पहिला सामना ‘टाय’
सुरेश रैना इज बॅक! ‘या’ टी२० स्पर्धेतून करतोय कमबॅक, स्वत: दिली माहिती