भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनीत झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत हा सामना अनिर्णीत राखला. त्यामुळे भारतीय संघाचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे. त्याचबरोबर पुढील सामन्यात अशाच प्रकारची कामगिरी केली जावी अशी अपेक्षा केली जात आहे. त्यांनंतर आता पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला आहे की, भारतीय संघ ब्रिस्बेन येथे होणारा चौथा सामना जिंकेल.
भारतीय संघाने तिसर्या कसोटी ज्या प्रकारे उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. त्याने पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर खूप प्रभावित झाला आहे. त्याने भारतीय संघाचे कौतुक केले. सध्या भारतीय खेळाडूंच्या दुखापतीमुळे झुंजत आहे. मात्र शोएब अख्तरला पूर्ण विश्वास आहे की, ब्रिस्बेन येथे खेळला जाणारा चौथा कसोटी सामना भारतीय संघ जिंकेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील 4 सामन्यापैकी 3 सामने पार पडले आहेत. यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्याचबरोबर एक सामना अनिर्णीत राहिला. त्यामुळे दोन्ही संघ मालिकेत बरोबरीत आहेत. या मालिकेतील चौथा सामना ब्रिस्बेन खेळला जाणार आहे. ब्रिस्बेन येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी फायदेशीर आहे असे म्हणले जाते.
भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे भारतीय संघाला धक्का बसला आहे. चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ युवा आणि नवोदित खेळाडूंसोबत उतरू शकतो.
शोएब अख्तर म्हणाला, “भारतीय संघा समोर चौथ्या कसोटी सामन्यासाठी खूप अडचणी आहेत. त्यांचे सर्व मुख्य वेगवान गोलंदाज मालिकेतून बाहेर पडलेत. परंतु भारतीय संघातील राखीव खेळाडूना एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. की त्यांच्या संघाने 3 सामन्यापर्यंत कठोर संघर्ष केला आहे आणि हा शेवटचा सामना आहे. जिथे आता त्यांना आपला जोर दाखवण्याची गरज आहे. त्यामुळे भारत हा सामना आणि मालिका आपल्या नावावर करेल. ”
शोएब अख्तर म्हणाला, भारतीय संघ कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर त्याने अजिंक्य रहाणेचे कौतुक केले. तो म्हणाला, “अजिंक्य रहाणेने फलंदाजी आणि संघाचे नेतृत्व दोन्हीत सुद्धा चांगली कामगिरी केली आणि स्वतःला सिद्ध केले.” त्याने सिडनी कसोटी सामन्यात सामना अनिर्णित राखण्यात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या चेतेश्वर पुजारा, आर अश्विन, रिषभ पंत आणि हनुमा विहारी या खेळाडूंची सुद्धा प्रशंसा केली.
महत्वाच्या बातम्या:
हनुमा विहारीचा खणखणीत स्ट्रेट ड्राईव्ह! बाबुल सुप्रियोंच्या ट्विटला दिले भन्नाट उत्तर
विराटपेक्षा रहाणेच्या नेतृत्वात खेळाडू अधिक मोकळेपणाने खेळत आहेत
ब्रिस्बेन में आप ही खेलो शुक्ला जी! त्या ट्विटमुळे सोशल मिडीयावर राजीव शुक्ला होत आहेत ट्रोल